खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर आणि इच्छुकांमध्ये उमेदवारीवरून खडाजंगी

खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर आणि इच्छुकांमध्ये उमेदवारीवरून खडाजंगी
खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर आणि इच्छुकांमध्ये उमेदवारीवरून खडाजंगी

पुणे(प्रतिनिधि)–विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. भाजपच्या गोटात तर प्रचंड घडामोडी घडत आहेत. भाजपमध्ये प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची भाऊगर्दी होताना दिसते आहे. त्यामुळे पक्षांतर्गत हेवेदावे समोर येत आहेत. असाच काहीसा प्रकार पुण्यातील खडकवासला मतदारसंघातील भाजपच्या बैठकीत पाहायला मिळाला. बैठकीदरम्यान भाजपच्या खडकवासला मतदार संघाचे आमदार  भीमराव तापकीर आणि उमेदवारीसाठी इच्छुक असलेले नगरसेवक प्रसन्न जगताप, नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांच्यात उमेदवारीवरून खडाजंगी झाली. विशेष म्हणजे पक्ष निरीक्षक धनंजय महाडिक यांच्यासमोरच भाजप नेत्यांमध्ये मोठा वाद झाला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

खडकवासला मतदारसंघातील धायरीमध्ये पक्ष निरीक्षक धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीदरम्यान मतदारसंघातील संभाव्य उमेदवार कोण असावा यासाठी पदाधिकाऱ्यांचं गुप्त मतदान घेण्यात आलं. बैठकीत आमदार भीमराव तापकीर यांनी संबोधित केले. मात्र त्यांच्यानंतर बैठकीत कोणालाच न बोलू देण्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या कारणावरुन वाद पेटला आणि पक्ष निरीक्षक धनंजय महाडिक यांच्यासमोरच भीमराव तापकीर आणि इच्छुक उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली.

अधिक वाचा  अजित पवारांबरोबर राष्ट्रवादीच्या या 9 मंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ : कर्तुत्ववान कार्यकर्त्याला जेव्हा दुय्यम स्थान दिले जाते, त्यावेळी अशा घटना घडतात-कोण म्हणाले असे?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. भाजपच्या गोटात तर प्रचंड घडामोडी घडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील कालपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. भाजपकडून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला जातोय. यासाठी पक्षाच्या हायकमांडकडून काही प्रमुख नेत्यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे निरीक्षक त्या त्या मतदारसंघात जावून आढावा घेत आहेत. पण या निरीक्षकांनादेखील आता अडचणींना सामोरं जावं लागत असल्याची माहिती समोर येत आहे. कारण काही मतदारसंघांमध्ये भाजप पक्षातील अनेक नेते इच्छुक आहेत. यावरुन पक्षांतर्गत गटबाजी आणि मतभेद समोर येत आहे.

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love