हिरानंदानी-क्रिसाला डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विकासातून हिंजवडी, पुणे येथे १०५ एकरचे इंटिग्रेटेड टाउनशिपचे अनावरण

Hiranandani-Krisala Developers
Hiranandani-Krisala Developers

पुणे- निरंजन हिरानंदानी समूहाने पुणे रिअल इस्टेट मार्केटमध्ये पदार्पण करत क्रिसाला डेव्हलपर्ससोबत १०५ एकरच्या संयुक्त विकास करारावर स्वाक्षरी केली आहे. हा प्रकल्प उत्तर हिंजवडी येथे असून, तो इंटिग्रेटेड टाउनशिप धोरणांतर्गत विकसित केला जाणार आहे. यात  निवासी, व्यावसायिक आणि रिटेल डेव्हलपमेंटचा समावेश असेल.

या संयुक्त विकासाअंतर्गत प्रथम टप्प्यात ३० एकर क्षेत्रात विकास केला जाणार असून, यामध्ये किमान ३ दशलक्ष चौरस फूट मालमत्ता उभारण्याची क्षमता आहे. या पहिल्या टप्प्यात सुमारे ₹५०० कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून, एकूण महसूल सुमारे ₹२१०० कोटींच्या घरात राहील. या प्रकल्पात अपार्टमेंट्स, व्हिला प्लॉट्स, ब्रँडेड निवासस्थाने आणि निवासी सुविधांचा समावेश असेल, जे घरखरेदीदारांसाठी संपूर्ण जीवनशैलीचा अनुभव देतील.

अधिक वाचा  राष्ट्रीय सब ज्युनिअर ज्यूदो स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राची तीन कांस्यपदकांची कमाई : आजचा दिवस गाजवला हरियाणा, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश खेळाडूंनी

या धोरणात्मक संयुक्त विकासाच्या माध्यमातून क्रिसाला डेव्हलपर्सच्या स्थानिक तज्ज्ञतेचा आणि हिरानंदानी समूहाच्या प्रदीर्घ ब्रँड अनुभवाचा लाभ घेतला जाणार आहे. या दोन्ही संस्थांचे उद्दिष्ट जमिनीसंदर्भातील नियोजन, परवानग्या आणि अंमलबजावणी यासह सर्व घटकांचे समन्वय साधून उत्कृष्ट विकास करणे आहे.

हिरानंदानी समूहाचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी म्हणाले, “मुंबई आणि पुणे यांच्यातील महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प मुंबई – पुणेच्या कनेक्टिव्हिटीला चालना देत आहेत, ज्यामुळे MMR आणि पुणे रिअल इस्टेट मार्केट गतिमान झाले आहे. ही कनेक्टिव्हिटी स्थलांतरित होत असलेल्या व्यावसायिकांसाठी उच्च दर्जाचे राहणीमान उपलब्ध करून देत आहे. येथील आयटी हब्स, उत्कृष्ट दळणवळण सुविधा आणि कुशल व्यावसायिकांमुळे पुण्यात रिअल इस्टेट क्षेत्रात मजबूत वाढ होत आहे. या दोन प्रमुख व्यापारी शहरांमधील अखंड जोडणीमुळे रिअल इस्टेट विकासासाठी अभूतपूर्व संधी उपलब्ध झाल्या आहेत.”

अधिक वाचा  भीमपलास, गौरी आणि पूरीयाकल्याण मधील सादरीकरणाने रसिकांना मिळाली चढत्या सायंकाळची सुरेल अनुभूती

क्रिसाला डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री आकाश अग्रवाल यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले, “मेगा पायाभूत सुविधा प्रकल्प या संकल्पनेवर आधारित ही टाउनशिप राहणीमान, समुदाय आरोग्य आणि पर्यावरणाविषयी जाणीव यावर भर देईल. हे टाउनशिप पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांपासून दुसऱ्या घराच्या शोधात असलेल्या खरेदीदारांपर्यंत, गुंतवणूकदार आणि एनआरआय ग्राहकांपर्यंत सर्वांसाठी समावेशक असेल. हा प्रकल्प शाश्वततेबाबत असलेल्या कटिबद्धतेमुळे वेगळा ठरणार आहे. आमच्या नामांकित ऊर्जा व संसाधन संस्थांसोबतच्या सहकार्यामुळे येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ४० च्या आसपास राखण्याचा आमचा प्रयत्न असेल, जेणेकरून रहिवाशांना निरोगी जीवन मिळेल.”

या प्रकल्पाची भौगोलिक स्थिती, विचारपूर्वक डिझाइन केलेल्या जागा आणि अतुलनीय सुविधांमुळे पुण्यातील इंटिग्रेटेड रेसिडेन्शियल रिअल इस्टेट क्षेत्रात नवीन मानक प्रस्थापित होईल. या टाउनशिपमध्ये शाश्वतता आणि आलिशान जीवनशैली यांचा सुरेख मेळ साधला जाणार आहे. हिरानंदानी समूह आणि क्रिसाला डेव्हलपर्स यांच्यातील हा संयुक्त उपक्रम आजच्या तेजीच्या रिअल इस्टेट बाजारपेठेतील संधींचा पुरेपूर लाभ घेण्यास दोन्ही संस्थांना सक्षम करेल.

अधिक वाचा  ज्येष्ठ इतिहासकार तथा संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते अंभ्रूणी धनलक्ष्मी मातेची प्राणप्रतिष्ठा संपन्न

 

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love