पुणे-भव्य सांस्कृतिक वारसासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणे येथे हिमालय ऑप्टिकलने आपल्या १४० व्या स्टोअरचे भव्य उद्घाटन केले आहे. हिमालय ऑप्टिकलची स्थापना १९३५ मध्ये झाली असून तिने देशभरातील ४७ शहरांमध्ये १४० स्टोअर्सचा विस्तार केला आहे. पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या एम. जी. रोडवर असलेल्या तिच्या नवीनतम अद्ययावत स्टोअर चे उद्घाटन पुण्याचे पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी हिमालय ऑप्टिकल चे संचालक श्री. देवांश बिनानी, राजा बहादूर मिल्स परिवारातील उमंग पित्ती आणि वैभव पित्ती सह अन्य मान्यवर ही उपस्थित होते.
हिमालय ऑप्टिकलचे संचालक श्री. देवांश बिनानी म्हणाले की, फ्रेम्स व सनग्लासेस च्या विस्तृत श्रेणी प्रदर्शित करण्यात आल्या असून त्यातील प्रत्येक डिझाइन आणि कारागिरीचा उत्कृष्ट नमुना आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठित हाय-एंड आयवेअर फॅशन ब्रँडच्या नवीनतम संग्रहांमधून या विशेष ऑफर काळजीपूर्वक तयार केल्या आहेत. हिमालय ऑप्टिकल हे क्रोम हार्ट्स, डिटा, मेबॅक, बर्बेरी, ब्वल्गारी, डोल्से अँड गब्बाना, एम्पोरियो अर्मानी, प्राडा, साल्व्हाटोर फेरॅगामो, टॉम फोर्ड, गुच्ची, व्हर्सेस, केल्विन क्लेन, रे- बॅन, ओकली, वोग, टॉमी हिलफिगर आणि इतर अशा ६० हून अधिक प्रतिष्ठित ब्रँड्सचे वैविध्यपूर्ण पर्याय देणारे, आलिशान आयवेअरच्या प्रेमींसाठीचे अतुलनीय आश्रयस्थान म्हणून उभे आहे.
हिमालया ऑप्टिकलची आपल्या ग्राहकांच्या आयकेअरच्या सर्वात चौखंदळ गरजा पूर्ण करण्याची कटिबद्धता कायम असून येथे वास्तविक उंची ३६० डिग्री नेत्र चाचणी उपलब्ध आहे. ती तेथील जागतिक दर्जाच्या, उच्च- प्रशिक्षित ऑप्टोमेट्रिस्ट्सच्या टीमद्वारे काळजीपूर्वक केली जाते.
श्री. बिनानी यांनी संरक्षणात्मक आयवेअरचे सखोल महत्त्व आणि नियमित डोळ्यांच्या तपासणीची आवश्यकता, विशेषतः योग्य प्रिस्क्रिप्शन सनग्लासेसची वाढती मागणी याविषयी भारतीय बाजारपेठेतील वाढती जागृती अधोरेखित केली. ते म्हणाले, ८५ वर्षापेक्षा जास्त वर्षांच्या वारसामुळे आमच्या ग्राहकांना डोळ्यांच्या काळजीबद्दल जागृत करण्याची आणि त्यांना त्यांच्या इच्छेनुसार टेलर मेड उपाय ऑफर करण्याची जबाबदारी आम्ही पार पाडतो.” तसेच त्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत महाराष्ट्रात सुमारे १० लक्झरी-केंद्रित स्टोअर्स उघडण्याच्या योजनेची घोषणा केली आणि आयवेअरच्या बाबत सर्वाधिक अभिरुची असलेल्यांसाठी नंदनवन निर्माण करण्याचे आश्वासन दिले. श्री उमंग पित्ती यांनी पुढे सांगितले की, पुण्यातच लक्झरी आयवेअरचे सर्वात मोठे कलेक्शन उपलब्ध करून दिल्यामुळे पुणेकरांना लक्झरी आयवेअरसाठी मुंबई आणि इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही.