जनता सहकारी बँकेच्या बँकिंग सेवेचे गौरवशाली अमृतमहोत्सवी वर्ष

Glorious Anniversary Year of Banking Services of Janata Sahakari Bank
Glorious Anniversary Year of Banking Services of Janata Sahakari Bank

पुणे : जनता सहकारी बँकेच्या बँकिंग सेवेचे गौरवशाली अमृतमहोत्सवी वर्ष आहे. अमृतमहोत्सवी वर्षाचा (७५ वर्षे) शुभारंभ कार्यक्रम बुधवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. शुभारंभ कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष रविंद्र हेजीब यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला बँकेचे संचालक सीए अभय माटे, सीए किरण गांधी, मकरंद अभ्यंकर आदी उपस्थित होते.

अमृतमहोत्सवी वर्ष शुभारंभ कार्यक्रमासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव उपस्थित राहणार आहेत. तर, श्री समर्थ रामदास स्वामी संस्थान, सज्जनगडचे अध्यक्ष भूषण स्वामी महाराज यांचे आशीर्वचन यावेळी होणार आहे.

अधिक वाचा  अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा : भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या मागणीने खळबळ

रविंद्र हेजीब म्हणाले, अमृतमहोत्सवी वर्षाच्या शुभारंभ कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बँकेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बोधचिन्हाचे अनावरण होणार आहे. तसेच बँकेची गृहपत्रिका गरुडझेप विशेषांकाचे प्रकाशन देखील यावेळी होणार आहे. आज जनता सहकारी बँक महाराष्ट्र राज्यातील १७ जिल्हे, गुजरात राज्यातील १ जिल्हा यातील ७१ शाखांमध्ये ग्राहक सेवा देत आहे. या प्रवासात १० लाखांपेक्षा अधिक ग्राहकांना सहकार क्षेत्राशी जोडण्यात यशस्वी झाली आहे.

सी.ए. अभय माटे म्हणाले, मुख्य कचेरी असलेल्या शहराच्या बाहेर शाखा विस्तार करणारी बँक, राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणेच व्यावसायिक ग्राहकांना कर्जविषयक सुविधा उपलब्ध करणारी, नागरी बँक क्षेत्रात अन्य नागरी बँकेचे विलीनीकरण करून ठेवीदारांचा सहकारी बँकिंग बद्दल विश्वास कायम ठेवणारी अशी अनेक वैशिष्ट्ये जनता सहकारी बँकेबद्दल सांगता येतील.

अधिक वाचा  गोव्यातून आलेल्या मद्याच्या ट्रकवर पुण्यात छापा : सौंदर्य प्रसाधनाच्या नावाखाली दारूची तस्करी

शाखा विस्तार, व्यवसाय वाढ, उत्तम ग्राहक सेवा, नाविन्यपूर्व सेवा याबरोबरीने येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाचा स्वीकार, तंत्रज्ञान आधारित (टेक्नोबेस) सेवा ग्राहकांना सहज उपलब्ध होण्यासाठीचे प्रयत्न, डीमॅट सेवेमध्ये देशातील पहिली डीपॉझीटरी पार्टीसिपंट म्हणून बँकेने मान मिळवला आहे. जनता सहकारी बँकेने स्थापनेपासून सर्वात कमी काळात शेड्यूल बँकेचा दर्जा मिळवला आहे. ग्राहकांच्या अमूल्य सहकार्याने बँकेने मार्च २०२३ वर्षअखेर रु.१४ हजार २८६ कोटीपेक्षा जास्त व्यावसायिक उलाढाल पूर्ण केली आहे.

समाजहिताच्या विचाराने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक मोरोपंत पिंगळे यांनी एक बँक पुणे शहरात असावी, असा विचार केला. दत्तोपंत जमदग्नी यांच्या सहकार्याने  जनता सहकारी बँक लि., पुणे ची स्थापना १८ ऑक्टोबर १९४९ रोजी पुणे शहरात थोरले बाजीराव रस्त्यावर पहिल्या शाखेच्या रूपाने झाली होती.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love