जमीन खरेदी केलेल्या मालकाला पैसे द्यायचे सोडा; त्याच्याकडेच मागितली 20 लाखांची खंडणी: पुण्यातील बड्या सराफासह चारजण जेरबंद


पुणे– जमीन विकत घेऊन उरलेली रक्कम तर सोडाच परंतु आपली उरलेली रक्कम मागण्यासाठी गेलेल्या जमीन मालकाला गोळ्या घालण्याची धमकी देवून 20 रुपयांची खंडणी मागणाऱ्या पांच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये पुण्याच्या बुधवार पेठ भागातील बडा सराफी व्यावसायिक गौतम जयंतीलाल सोळंकी आणि रणधीर जयंतीलाल सोळंकी यांचा समावेश आहे.

गौतम आणि रणधीर सोळंकीसह दिलीप साहेबराव यादव, सुमीत प्रकाश साप्ते आणि सागर दत्तात्रय मुजुमले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, रणधीर सोळंकीसह चार जणांना अट्क करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे भोर तालुक्यातील ससेवाडीचे रहिवाशी आहेत. त्यांनी २०१६ मध्ये वडिलोपार्जित जमीन विक्रीचा व्यवहार आरोपींबरोबर केला होता. त्यांनी आपली जमीन ९३ लाख रूपयांना विकली होती. त्यापैकी ३२ लाख ५० हजार रूपयांची रक्कम आरोपींनी त्यांना दिली होती. उर्वरित ६० लाख २५ हजार रूपयांची रक्कम फिर्यादी सोळंकी यांच्या दुकानात गेले असता त्यांनी चेक देण्यास नकार दिला. त्यानंतर फिर्यादी हे मध्यस्थी असलेल्या दिलीप यादव यांच्या कार्यालयात गेले. मात्र यादव आणि साप्ते यांनी त्यांच्या कमरेला असलेले रिव्हॉल्व्हर त्यांच्या अंगावर रोखले आणि २० लाख रूपये दिल्याशिवाय चेक देणार नाही. काय करायच ते कर. पुन्हा आला तर गोळ्या घालीन आणि पोलिसांमध्ये गेलास तर याद राख अशी धमकी त्यांनी फिर्यादी यांना दिली.

अधिक वाचा  डेटींगचा मोह न आवरलेल्या जेष्ठ नागरिकास सायबर चोरांनी घातला पावणेचार लाखांचा गंडा ..

त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. या अर्जाची खातरजमा करून त्यांच्या ऑफिस व घरावर छापा टाकून चार जणांना अटक केली आहे. छापादरम्यान शंभरहून अधिक मूळ खरेदीखत, साठेखत, विसारपावती, संमतीपत्र, करारनामे, एमओयू मिळाले आहेत. यात सही केलेले ब्लँक चेकबुक व चेक, सही केलेले मुद्रांक, दोन आलिशान गाड्या अणि दोन रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास विरोधी पथकाचे खंडणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील करत आहेत.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love