पाच मजली इमारत कोसळली;२०० ते २५० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती


रायगड(ऑनलाईन टीम)—रायगड जिल्ह्यातील महाड आज संध्याकाळी एक भीषण दुर्घटना घडली आहे. महाड येथील काजळ पुरा परिसरात एक पाच मजली इमारत कोसळली असून ढिगाऱ्याखाली सुमारे २०० ते २५० लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सध्या पोकलेन आणि अन्य साहित्यासह बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, हा संपूर्ण ढिगारा उपसण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  त्यानंतरच खरी परिस्थिती समोर येईल.

आज संध्याकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास ही इमारत पत्त्यासारखी कोसळली. इमारतीचा पाया खचल्यामुळे ती आहे तशीच खाली बसली. या इमारतीचं नाव ‘तारिख गार्डन’ असं होतं. या इमारतीचं बांधकाम निकृष्ठ दर्जाचं होतं, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. सध्या पोलीस, अग्नीशमन दलाचे जवान आणि बचाव पथक यांच्याकडून ढिगारा उपसायचे काम सुरु आहे. लाईटचीदेखील व्यवस्था करण्यात येत आहे, जेणेकरुन रात्रीच्या वेळी देखील ढिगारा उपसायचे काम सुरु राहिल.

अधिक वाचा  स्वप्नपूर्ति भव्य राममंदिर निर्माणाची : भाग – 8 वा  : बाबरी ढाच्याची उभारणी व हिंदू समाजाच्या अटी

ही इमारत 10 वर्षे जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. या 5 मजली इमारतीत साधारण 50 फ्लॅट होते. यात 200 ते 250 लोक राहत होते.  इमारत कोसळल्यामुळे मोठा ढिग निर्माण झाला आहे. हा ढिग बाजूला करुन नागरिकांना वाचवण्यात अनेक अडचणी येत आहेत. स्थानिकांनी तातडीने जेसीबी लावून ढिगारा उपसण्याचं काम सुरु केलं आहे. हा ढिगारा उपसायला जवळपास दीड ते दोन दिवस लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंरच खरी परिस्थिती कळेल. दरम्यान, इमारतीतील एकाही व्यक्तीसोबत अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love