बेवारस रुग्णांवर उपचार करण्याऐवजी रात्रीच्या वेळी डॉक्टरच त्यांना निर्जनस्थळी सोडून येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस


पुणे(प्रतिनिधि)- पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या बेवारस रुग्णांवर उपचार करण्याऐवजी रात्रीच्या वेळी त्या रुग्णांना ससूनमधील डॉक्टरच निर्जनस्थळी सोडून येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा संपूर्ण प्रकार वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित डॉक्टरचं रुग्णालय प्रशासनाने निलंबन देखील केलं आहे.डॉ. आदीनाथ कुमार असे या डॉक्टरचे नाव आहे.

ससून रुग्णालयात निलेश नावाचा मध्यप्रदेश येथील ३२ वर्षाचा रुग्ण हा १६ जून रोजी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता.. त्याच्यावर उपचार देखील झाले एवढंच नाही तर त्याच्या पायाची शस्त्रक्रिया देखील झाली आणि कालांतराने तो रुग्ण काही प्रमाणात बरा झाला.  पण शस्त्रक्रिया झालेल्या अवघ्या काही दिवसात निवासी डॉक्टरांनी संबंधित रुग्णाला चक्क ऑटो रिक्षामध्ये बसत येरवड्याच्या एका निर्जन स्थळी सोडल्याचे समोर आलं आहे.  निर्जनस्थळी सोडत असल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.. मिळालेल्या माहितीनुसार, २२ जुलै रात्री दीड वाजताची ही घटना आहे. ससून रुग्णालयातील डॉक्टर आदी कुमार यांनी बेवारस रुग्णांवर उपचार करुन निर्जनस्थळी सोडून दिलं. हा प्रकार वंचित आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी उघडकीस आणला आहे. त्यानुसार ससूनमधील डॉक्टर व त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक वाचा  रस्त्यावर झोपलेल्या उसतोडणी कामगाराच्या एका वर्षाच्या मुलाचे अपहरण

दादासाहेब गायकवाड हे बेवारस रुग्णांची सेवा करतात. रस्त्यावर बेवारस पडलेल्या जखमी व्यक्तींना ते ससून रुग्णालयात दाखल करतात. परंतु दुसऱ्या दिवशी त्या रुग्णाला पाहण्यासाठी गेल्यावर त्यांना तो रुग्ण गायब झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तपास केला त्यावेळी हा गैरप्रकार समोर आला. रुग्णालयातील या गलथान कारभाराचा भांडाफोड करण्यासाठी त्यांनी तपास सुरु केला.

नेमकं काय घडलं?

सोमवारी पहाटे दीड वाजता रितेश रिक्षा घेऊन ससून रुग्णालयाबाहेर उभे होते. ससून रुग्णालयातील डॉ. आदी कुमार यांनी एका रुग्णाला सोडून यायचे आहे, येणार का अशी चौकशी केली. कुठे सोडायचे अशी विचारल्यावर ‘इथून लांब नेऊन सोड, पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला नाही पाहिजे, अशा ठिकाणी सोडायला सांगितले. ‘नेमके कुठे सोडू? मी एकटा कसा सोडवू, नातेवाईक पाहिजे सोबत’ असे विचातल्यावर डॉक्टरांनी म्हटलं की तू नवीन आहेस, आमचा नेहमीचा रिक्षावाला ५०० रुपये दिले की बरोबर सोडून येतो.

अधिक वाचा  दारु पिऊन गाडी चालवल्यास गाडी चालवण्याचा परवाना कायमचा रद्द होणार : पुणे पोलिसांचा निर्णय

काही वेळाने डॉक्टरानी सांगितल्यानुसार, नवीन बिल्डिंगमधला दोन्ही पाय नसलेला, हातात सुई व विविध ठिकाणी जखमी झालेला एक रुग्णाला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रिक्षात ठेवले. त्या रुग्णाना घेऊन रिक्षासोबत डॉक्टर व त्यांचा सहकारी विश्रांतवाडी येथील एका दाट वडाच्या झाडाजवळ पोहचले. अंधारात व पावसात त्या रुग्णाला त्या झाडाखाली सोडून डॉक्टर निघून गेले.

काही वेळाने रितेशने पोलिसांना याबाबत माहिती दिली व दादासाहेब गायकवाड यांच्या मदतीने त्या रुग्णाना पुन्हा ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच येरवडा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार केली. त्यानुसार रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक

घटनेची माहिती मिळताच पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससून रुग्णालयातील डीन यांची भेट घेतली. संबंधित डॉक्टरला निलंबित करण्याची त्यांनी मागणी केली. निलंबित करूनच या डॉक्टरची चौकशी करण्यात यावी असाही त्यांनी आग्रह धरला. आमदार रवींद्र धंगेकर यांच्या मागणीनुसार डॉक्टरचं निलंबन झालं असून प्रशासनाकडून चौकशी सुरू झाली आहे.

अधिक वाचा  पुणे मनपाच्या टीडीआर प्रक्रियेत गंभीर त्रुटींचा आरोप: माजी विरोधी पक्षनेत्यांचे आयुक्तांना पत्र : वादग्रस्त DRC मुळे प्रशासकीय कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

 

 

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love