स्वप्नपूर्ति भव्य राममंदिर निर्माणाची : भाग – ६ : अयोध्येवरील पहिला हल्ला

Congress leader first called for the liberation of Ayodhya, Kashi and Mathura in 1983.
Congress leader first called for the liberation of Ayodhya, Kashi and Mathura in 1983.

Ayodhya city : अयोध्या नगरी (Ayodhya) प्रभू रामचंद्राचे (Prabhu Ramchandra) जन्मस्थान (Birthplace) म्हणून संपूर्ण हिंदू (Hindu) समाजाला व भारत वर्षाला देखील पवित्र. या अयोध्या नगरीवर अनेक परकीय आक्रमकांचा डोळा होता. कारण अयोध्या नगरी संपन्न तर होतीच पण हिंदू समाजाचा( Hindu society) मानबिंदू देखील होती, म्हणूनच या नगरीला अनेकदा लक्ष्य करण्यात आले. परंतु या नगरीवरील पहिला हल्ला जो झाला, तो हिंदू समाजाने परतवला हा आपल्या शौर्याचा इतिहास(A history of chivalry) आहे. (First attack on Ayodhya)

महम्मूद गझनीचा (Mahmud Ghazni) पुतण्या सालार मसूद (Salar Masud) हा दिल्लीत सैन्य एकत्र करत होता, तो सर्वशक्तीनिशी अयोध्येवर हल्ला करेल हे लक्षात घेऊन महाराज सुहेलदेवांनी (Maharaj Suheldev) अयोध्येच्या आसपास असणाऱ्या सतरा-अठरा राजांना एकत्र केले. या देशाच्या इतिहासात प्रथमच आपल्या भूमीच्या रक्षणासाठी व इस्लामी आक्रमणाचा सामना करण्यासाठी छोटे – मोठे हिंदू राजे संघटित झाले. या सर्व राजांनी एकत्र येऊन विशाल सेना उभी केली. दोन लाख सैनिकांचे घोडदळ आणि तीन लाख सैनिकांचे पायदळ त्यांनी उभे केले. पुढच्या काळात आणखी वेगवेगळ्या राजांनी या सैन्यामध्ये भर घातली आणि ते सैन्य दहा लाख इतके झाले.

अधिक वाचा  राजीव सातव यांच्या अंत्ययात्रेत जमलेल्या त्यांच्या जवळच्या 20 नातेवाईकांव्यतिरिक्त अन्य राजकीय आणि सर्वसामान्य नागरिकांवर गुन्हे दाखल करा

सालार मसूदने सन १०३३ मध्ये जेव्हा अयोध्येवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस बहराईचपासून जवळ प्रयागपुरा येथे घागरा नदीच्या तीरावर युद्धाला सुरुवात झाली. अतिशय नियोजनबद्धरीतीने युद्ध लढून हिंदू राजांनी सालार मसूदला त्यांच्या संपूर्ण सैन्यासह कापून काढले. या युद्धात हिंदू राजे विजयी झाले व अयोध्येचे रक्षण झाले. सालार मसूदसहित संपूर्ण सेनेचा हिंदूंनी सर्वनाश केला त्यामुळे या युद्धात अरबस्थान आणि इराणच्या प्रत्येक घरातील दिवा विझला. अशा शद्बात शेख अब्दुर रहमान चिश्ती याने या युद्धाची हकीकत नोंदवली आहे.

डॉ. सचिन वसंतराव लादे, पंढरपूर

 मोबाईल फोन क्र. : ७५८८२१६५२६

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love