वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सासरा आणि दीराला २८ मे पर्यंत कोठडी

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सासरा आणि दीराला २८ मे पर्यंत कोठडी
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सासरा आणि दीराला २८ मे पर्यंत कोठडी

पुणे(प्रतिनिधि) –मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात गेल्या सात दिवसांपासून फरार असलेले सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पुणे पोलिसांनी अटक   केल्यानंतर आज(शुक्रवार) या दोघांना आज दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २८ मे पर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सुरुवातीला वैष्णवी शशांक हगवणे (वय २४) हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जात होते. मात्र, शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्याने हे प्रकरण खुनाकडे वळले. वैष्णवीच्या आई-वडिलांनी तिचा हुंड्यासाठी छळ करून हत्या केल्याचा गंभीर आरोप केला होता.

या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वीच वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे आणि नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना अटक केली होती. त्यांना २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची अनेक पथके रवाना झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पथके वाढवण्याचे आदेश दिले होते. गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्याच्या एकूण आठ टीम त्यांच्या मागावर होत्या. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे स्वतः या प्रकरणी लक्ष ठेवून होते. आरोपी प्रत्येक वेळी आपले ठिकाण बदलत असल्याने त्यांना पकडणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरले होते.

अधिक वाचा  नालेसफाईत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, दोषींवर कठोर कारवाई करा: मुरलीधर मोहोळ यांचे महापालिकेला सक्त निर्देश

शुक्रवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना बावधन पोलिसांनी अटक केली. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे अटक होण्याअगोद तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये मटणावर ताव मारत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. पोलिसांनी रात्री दोन वाजता त्यांना ट्रेस केले आणि पहाटे साडेचार वाजता स्वारगेट बस स्थानकातून, जिथून ते पळून जाण्याच्या तयारीत होते, त्यांना अटक केली.

२८ मे पर्यंत पोलीस कोठडी

राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना आज दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना २८ मे पर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याआधी वैष्णवी हगवणे यांचे पती शशांक हगवणे, त्याची आई लता हगवणे, बहीण करिष्मा हगवणे यांना २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अधिक वाचा  खगोलशास्त्रज्ञ आणि विचारवंत डॉ. जयंत नारळीकर अनंतात विलीन

गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे, मयत वैष्णवी हगवणे यांच्या अंगावर व्रण आहेत. यापूर्वी अटक केलेल्या आरोपी आणि राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांची एकत्रित चौकशी करणे बाकी आहे. – वैष्णवी यांना स्त्री धन म्हणून मिळालेल्या सोने तारण ठेवून घेतलेल्या पैशांचे नक्की काय केले? असा सवाल सरकारी वकिलांनी उपस्थित केला आहे.

 

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love