ईटशुअर हे भारतातील पहिले स्मार्ट फूडकोर्ट पुण्यात सुरू


पुणे : जगातील सर्वांत मोठी इंटरनेट रेस्टॉरंट कंपनी असलेल्या रिबेल फूडसने पुण्यात लॉ कॉलेज रोड येथे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ 15 पेक्षा अधिक लोकप्रिय ब्रँडससह एकाच छताखाली देणारे व भारतातील पहिले स्मार्ट फूडकोर्ट सुरू केले आहे.

हे अनोखे फ्लॅगशिप स्टोअर 3000 चौरस फूट अशा प्रशस्त जागेत असून संपूर्ण डिजिटल अनुभव ग्राहकांना प्रदान करेल.नवीन ईटशुअर फूडकोर्टमध्ये ग्राहकांना किऑस्क्स व आयपॅडस तसेच टेबलवर असलेले क्यूआर कोडस स्कॅन करून ऑर्डर देता येईल. ऑर्डर एकदा तयार झाली की स्टोअरमधील डिजिटल स्क्रीनद्वारे किंवा व्हॉटसअ‍ॅप मेसेजद्वारे ग्राहकांना कळविण्यात येईल.

या अनोख्या डिजिटल आर्डरिंग अनुभवाबरोबरच ईटशुअर फूडकोर्टमध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ प्रदान करणारे लोकप्रिय ब्रँडस असतील.यामध्ये बेहरोज बिर्याणी,ओव्हन स्टोरीज पिझ्झा,फोसोज,मॅड ओव्हर डोनट,कॅफे गुडलक,व्हेंडीज,थंबी लंचबॉक्स,मरकेश,स्ले कॉफी,स्मूर चॉकलेटस,झोमोज्,फिरंगी बेक व इतर अनेक ब्रँडसचा यात समावेश असून ग्राहक नाश्ता,दुपारचे व रात्रीच्या जेवणाचा आनंद घेऊ शकता.क्युएसआर (क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट) किंवा फूडटेक कंपनी तर्फे प्रदान करण्यात येणारी भारतातील अशा प्रकारची ही पहिली सेवा आहे. पुढील दोन वर्षांत विविध प्रकारांमध्ये 100 ऑफलाईन स्टोअर्स सुरू करण्याचे ईटशुअरचे उद्दिष्ट आहे.

अधिक वाचा  जिविका हेल्थकेअर पुणे महानगरपालिकेकडून ऑन-ग्राउंड नियमित आणि गोवर लसीकरण भागीदार म्हणून नियुक्त

ऑर्डर करण्याच्या अनुभवाची पुनर्निर्मिती

ब्रिक अ‍ॅन्ड मॉर्टर तत्त्वावर असलेल्या या जागेत ग्राहकांना खाद्यपदार्थांचे मर्यादित पर्याय आहेत.पारंपरिक फूडकोर्टमध्ये अनेक ब्रँडस असतात व प्रत्येक आऊटलेटवर ग्राहकांच्या मोठ्या रांगा असतात.त्यामध्ये ग्रुपमध्ये काही जणांच्या आर्डर इतरांपेक्षा आधी येऊ शकतात व एकंदर

अनुभवावर प्रभाव पडू शकतो.नवीन ईटशुअर फूडकोर्टसह हा अनुभव सुधारण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे,येथे ग्राहकांना प्रत्येक ब्रँडसाठी वेगळ्या रांगेत उभे राहावे लागत नाही आणि डिजिटल ऑर्डरिंग अनुभवासह आपल्या आर्डरच्या स्टेटसचा पाठपुरावा घेता येतो आणि ग्रुपमध्ये आनंद घेता येतो. रिबेल फूडसच्या ऑपरेटींग प्रणाली आणि तंत्रज्ञानयुक्त वैशिष्ट्यांसह एकाच छताखाली अनोखे डिजिटल ऑर्डरिंग अनुभव देणारे हे भारतातील पहिले स्मार्ट फूडकोर्ट आहे.

ग्राहकांमधील लोकप्रिय ब्रँडस एकाच छताखाली

या नवीन फूडकोर्ट मध्ये एकाच ऑर्डरमध्ये विविध ब्रँडसकडून ऑर्डर करता येईल हे ईटशुअरचे वैशिष्ट्य आहे.ग्राहकांना आपल्या ब्रँडसच्या  विविध रेस्टॉरंटसमधून ऑर्डर करता येईल,ज्यामध्ये बेहरोज बिर्याणीपासून ते ओव्हन स्टोरीच्या पिझ्झा पर्यंत,स्मूर चॉकलेटसच्या गोड पदार्थांपासून स्ले कॉफीच्या पेयपर्यंत कुठल्याही अतिरिक्त रांगेत न थांबता एकाच ऑर्डरमध्ये आनंद घेता येईल.अशा प्रकारे कोणतीही चव,मूड किंवा प्राधान्य असो कुटुंब,जोडपे,ग्रुप्स किंवा अगदी एकटा व्यक्ती सुध्दा दिवसातल्या कुठल्याही वेळी आपल्या आवडीचे खाद्यपदार्थ ऑर्डर करू शकतात.ग्राहकांच्या डिजिटल आर्डरिंग अनुभवामध्ये फूडकोर्टच्या आकर्षक डिझाईन आणि बैठक व्यवस्थेचा आनंद देखील ग्राहक घेऊ शकतात.नवीन स्टोअरमध्ये जागतिक दर्जाच्या सुरक्षिततेच्या प्रक्रियांचे पालन केले जाईल,ज्यामुळे ताजेपणा,सुरक्षितता आणि स्वच्छता सुनिश्‍चित होईल.

अधिक वाचा  रंगावली आणि मानवी साखळीतून उलगडले हृदयाचे महत्व

याबाबत अधिक माहिती देताना रिबेल फूडसचे सहसंस्थापक सागर कोचर म्हणाले की, ईटशुअरची श्रेणी निर्माता म्हणून ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने पहिल्या स्मार्ट फूडकोर्टमध्ये ईटशुअरच्या परिसंस्थेमध्ये हजारो नवीन ग्राहक जोडले जातील. ईटशुअर स्मार्ट फूडकोर्टसह आम्ही एकाच छताखाली विविध ब्रँडस, रांगेत उभे न राहता आणि डिजिटल ऑर्डर ट्रॅकिंगसह पारंपारिक अनुभव नव्या कल्पनेसह आणण्याचा प्रयत्न केला आहे. ईटशुअर फूडकोर्टमध्ये आमच्या अ‍ॅपसारखेच ग्राहकांना विविध लोकप्रिय ब्रँडसचे खाद्यपदार्थ एकाच ऑर्डरमध्ये मागविता येणार असून कुठलीही तडजोड न करता त्यांच्या आवडत्या पदार्थांचा आनंद घेता येणार आहे.

ऑनलाइन फूड इंडस्ट्रीमध्ये डायरेक्ट-टू-कन्झ्युमर सेेवेच्या प्रवासात प्रवर्तक ठरत रिबेल फूड्स ही जगातील सर्वात मोठी इंटरनेट रेस्टॉरंट कंपनी बनली आहे. ईटशुअर अ‍ॅपवर या फूडकोर्टसारखेच अ‍ॅपवरील फूडकोर्टद्वारे देखील ग्राहकांना असाच अनुभव मिळणार आहे व एकाच वेळी अनेक विविध  ऑर्डर करता येणार आहे. संपूर्ण भारतभरातील ग्राहकांनी ईटशुअर अ‍ॅपला पसंती दिली आहे,ज्यामध्ये 75 हून अधिक भारतीय शहरांमध्ये पाच दशलक्षपेक्षा अधिक डाऊनलोडस झाले आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love