पुण्यात फर्ग्युसन रस्त्यावरील पबमध्ये स्वच्छता गृहात ड्रग्जचे सेवन : व्हिडिओ व्हायरल : पाचजण ताब्यात

Drug party case on FC Road
Drug party case on FC Road

पुणे(प्रतिनिधी) -पुण्यातील गोखले (फर्ग्युसन) रस्त्यावरील एका पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमात प्रसारित झाल्यानंतर रविवारी खळबळ उडाली. पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे नियम धुडकावून पहाटे पाचपर्यंत पब सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी मॅनेजर,  कर्मचारी आणि हॉटेलचे ३ पार्टनर यांना ताब्यात घेतले आहे.

संतोष कामठे, रवी माहेश्वरी, मानस मलिक,  योगेंद्र आणि शर्मा असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. डेक्कन परिसरातील एल थ्री लिक्विड लेजर लाऊंज (L3 – Liquid Leisure Loung) या हॉटेलमध्ये शनिवारी पहाटे पाच वाजेपर्यंत मध्य पार्टी रंगलेली होती. या पार्टीमध्ये काही तरुण स्वच्छतागृहात जाऊन ड्रग्स घेत होते. त्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.या युवकांकडील हे ड्रग्ज, मॅफेनड्रग्स असल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आलं आहे. याप्रकरणी, पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे.

अधिक वाचा  काहीजण सुपात आहेत तर काहीजण जात्यात आहेत;या जन्मी केलेलं याच जन्मी भोगायचं आहे- चंद्रकांत पाटील

कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पुणे पोलीस, उत्पादन शुल्क विभाग आणि महापालिकेने कल्याणीनगरसह शहरातील विविध भागांत असलेल्या पबवर कारवाईचा बडगा उगारला. बेकायदा बांधकामे, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. मात्र, अशातच फर्ग्युसन रस्त्यावरील एका पबमध्येच पहाटे पाचपर्यंत सुरू असलेल्या पार्टीत प्रसाधनगृहात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या हॉटेलमध्ये अनेक अल्पवयीन मुलांना देखील दारू देण्यात आल्याचे समोर आले आहे. कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी शहरातील सर्व पब, बार, रुफ टॉप हॉटेल वर कारवाई करीत त्यांना सील ठोकले होते. मात्र, त्यानंतर देखील मद्य पार्टी आणि ड्रग्ज पार्ट्या सुरू असल्यामुळे पोलीस नेमके करतायेत काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अधिक वाचा  युवा कलाकारांनी गाजवला तालचक्र महोत्सवाचा दुसरा दिवस-बहारदार सांगीतिक मैफलीनी पुणेकर मंत्रमुग्ध

पबमध्ये प्रवेश देण्यापूर्वी वयाची शहानिशा करण्यात यावी. अल्पवयीन मुलांना पबमध्ये प्रवेश देऊ नये, तसेच त्यांना मद्य विक्री करण्यात येऊ नये. रात्री साडेबारापर्यंत पब सुरू ठेवावेत. नागरिकांना त्रास झाल्यास त्वरीत कारवाई करण्यात येईल, अशा सूचना पबचालकांना देण्यात आल्या होत्या. कल्याणीनगर अपघात प्रकरणात ब्लॅक आणि कोझी पबच्या मालकासह, व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होेते. महिनाभरानंतर त्यांची नुकतीच जामीनावर मुक्तता करण्यात आली. फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्वीड लिझर लाऊंज पहाटे पाचपर्यंत सुरू होता. तरुण- तरुणी मद्यपान करत होते. प्रसाधनगृहात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची चित्रफीत प्रसारित झाल्यनंतर आता पोलीस, उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईकडे लक्ष लागून राहिले आहे, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love