पुण्यातील दुसरे आश्चर्य:कोरोनाची लस घेतलेल्या डॉक्टरांना 38 दिवसानंतर कोरोनाची लागण


पुणे- कोरोनाची लस पहिल्या टप्प्यात सर्वात अगोदर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. हे लसीकरण सुरू असताना पुण्यात एक आश्चर्यकारक प्रकार गेल्या आठवड्यात समोर आला होता. ससून रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला लस दिल्यानंतर या डॉक्टरची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती त्यानंतर पिंपरी-चिंचवड येथे आणखी एक आश्चर्यकारक प्रकार समोर आला असून कोरोनाची लस घेतलेले डॉक्टर तबबल 38 दिवसांनंतर कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. भोसरी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. पिंपरी चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले आहे.

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या डॉक्टरांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जात आहे. संबंधित डॉक्टरांनीही ही लस घेतली होती. मात्र त्यांना 38 दिवसानंतर अंगदुखी ,सर्दी, खोकला, अशी लक्षणे दिसल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये त्यांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे.

अधिक वाचा  Corona Vaccine: आमच्यापासून कोरोना लस अजून किती दूर आहे?

दरम्यान, संबंधित डॉक्टरांनी लस घेण्याअगोदर प्रवास केला आहे का? परतल्यानंतर त्यांना कुठली लक्षणे आढळून आली का? त्यानं दूसरा लसीचा दूसरा डोस घेतला आहे का? याबाबत तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

चाचणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. त्यांची तातडीने विलगीकरण करून वायसीएममध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे लसीकरणानंतर कोणाकोणाला त्रास झाला. त्याचे काही आरोग्यावर काही परिणाम जाणवले का? तसेच अजूनही कोणाला संसर्ग झाला याविषयी माहिती मागविली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love