लसीचे नीट वाटप करा;आम्ही राजकारणाचे उत्तर जरूर देऊ- प्रकाश जावडेकर


पुणे- काल संध्याकाळी सहा वाजेपर्यंतचा देशभराचा अहवाल माझ्याकडे आहे. यामध्ये महाराष्ट्राला १ कोटी १२ लाख एवढे लसीचे डोस महाराष्ट्राला मिळाले आहेत. १ कोटींपेक्षा अधिक केवळ तीन राज्यांनाच मिळाले आहेत. राजस्थान, गुजरात व महाराष्ट्र. त्यापैकी ९५ लाख कालपर्यंतचे आहेत, कारण आज थोडे  आणखी वाढले आहेत. १५ लाख ६३ हजार वॅक्सीन शिल्लक आहेत. त्यामुळे यांचं नीट वाटप झालं पाहिजे. म्हणजे लस संपली असं कुठंही सांगितलं जाणार नाही असा टोला केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्य सरकारला लगावला.  ही आरोप प्रत्यारोपाची वेळ नाही आम्ही राजकारणाचे उत्तर जरूर देऊ असेही जावडेकर म्हणाले.

पुण्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीस केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांची देखील उपस्थिती होती. बैठकीनंतर जावडेकर पत्रकारांशी बोलत होते.

अधिक वाचा  काही लोकांचा बॉलिवुड बाहेरच्या राज्यामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न चाललाय - अजित पवार

कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर टेस्टिंग, ट्रॅकींग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंटसाठी अधिकचे मनुष्यबळ लागणार आहे. ते मनुष्यबळ घेण्यासाठी नॅशनल हेल्थ मिशनमधून केंद्र सरकार पैसे देणार असल्याचे केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. कोरोनाचे हे राष्ट्रीय संकट आहे असे आम्ही मानतो.  सगळी राज्य सगळी जनता आमचीच आहे. त्यामुळे जिथे परिस्थिती गंभीर आहे तिथे जास्त लक्ष आणि उपाय अशा स्वरूपाचं केंद्र सरकारचं धोरण आहे, असेही ते म्हणाले.

पुणे जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज संबंधित अधिकाऱ्यांसामवेत बैठक पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला जावडेकरही उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

जावडेकर म्हणाले, “पुणेकर जनतेने आज जनता कर्फ्यू सारख्या भावनेने करोना कर्फ्यूचं अतिशय उत्तम पालन केलं. या बद्दल पुणेकर जनतेला निश्चत धन्यवाद दिले पाहिजे. कारण, करोनाची साखळी तोडण्यासाठी हे जे उपाय योजले जात आहेत, त्यांचं आपण पालन केलं पाहिजे, ही त्यामध्ये भावना आहे. सगळ्या मोठा प्रश्न व्हेंटिलेटर्स संदर्भात होता. मी आज केंद्रातील सर्व संबंधित अधिकरी, मंत्र्यांशी बोलणं केलं. त्यामुळे लगेच ११२१ व्हेंटिलेटर्स महाराष्ट्रासाठी पुढील तीन-चार दिवसांत इथं दाखल होतील. यातील ७०० गुजरातमधून व ४०० आंध्र प्रदेशमधून येत आहेत. ऑक्सिजन देखील औद्योगिक उत्पादन जिथं होतं तिथून, ऑक्सिजन मिळण्यासाठी देखील केंद्र सरकार महाराष्ट्राला सहकार्य करणार आहे. केंद्राच्या ३० टीम या महाराष्ट्रात आलेल्या आहेत. या ३० टीम विविध जिल्ह्यांमधील परिस्थितीचा आढावा घेऊन आणखी काय करायला हवं? यासंबंधीचा अभिप्राय त्यांनी तयार केलेला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love