महिंद्रा लाइफस्पेसेस मध्ये एन- पल्स च्या आधारावर डिजिटाइज्ड प्रकल्प व्यवस्थापन होणार


पुणे- गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा विकास क्षेत्रांमध्ये व्य्ववसाय करणाऱ्या कंपन्यांसाठी एंटरप्राइज पातळीवर चालणारे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आघाडीवर असलेल्या नाधी इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीजने त्यांचे एन-पल्स ( nPulse ) हे सॉफ्टवेअर महिंद्र लाइफ स्पेसेस mahindra lifespaces मध्ये प्रकल्प व्यवस्थापन आणि नियंत्रण यासाठी वापरले जाणार असल्याचे जाहीर केले आहे.  

 महिंद्र लाइफस्पेसेस च्या बांधकाम प्रकल्पांमध्ये अंदाजपत्रक व्यवस्थापन, नियोजन, प्रकल्पाच्या प्रगतीचे निरीक्षण, गुणवत्ता नियंत्रण, सुरक्षितता आणि सुपूर्दकरण अशा महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये डिजिटायझेशन आणि सुसूत्रता आणण्यासाठी एन-पल्स चे साह्य घेतले जात आहे. महिंद्र लाइफस्पेसेस च्या सुमारे २० लाख चौ. फू. क्षेत्रफळ असलेल्या विविध बांधकाम प्रकल्पांमध्ये एन पल्स च्या साह्याने मोबाइल फोन वर मिळणारी ताजी माहिती, स्वयंचलित अहवाल व सूचना तसेच डॅशबोर्ड आणि अनॅलिटीक्स ही कामे होत आहेत.  

अधिक वाचा  सिल्व्हर लेक करणार रिलायन्स रिटेलमध्ये 7 हजार 500 कोटींची गुंतवणूक

महिंद्र लाइफस्पेस डेव्हलपर्स च्या हॅपीनेस्ट कल्याण आणि हॅपीनेस्ट पालघर, महिंद्र हॅपीनेस्ट या अफोर्डेबल हाउसिंग व्यवसायातील प्रकल्पांमध्ये एन पल्स वापरले जात आहे. कंपनीच्या मुंबईतील व्हिसिनो आणि पुण्यातील सेंट्रलिस या उच्च मध्यम गृहप्रकल्पांतही एनपल्सचा वापर होत आहे. टप्प्या टप्प्याने आणखीही काही प्रकल्पात एन प्लस चा वापर सुरु करण्याचे महिंद्र लाइफस्पेसेस चे धोरण आहे.  

महिंद्र लाइफस्पेसेस चा भागीदार म्हणून काम करण्यात आम्हाला मोठे समाधान आहे. महिंद्र लाइफस्पेसेसचा प्रकल्प उभारणी आणि कार्यप्रणालीत तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर असलेला भर आणि एन पल्स ची क्षमता या ताकदीवर आम्ही प्रकल्प उभारणीच्या प्रक्रियेत आमूलाग्र बदल घडवून आणू याची आम्हाला खात्री आहे. कामाला लागणारा वेळ, कामाची गुणवत्ता, सुरक्षितता यांबद्दल तत्काळ माहिती देऊन, कामातील त्रुटी तसेच खर्चात संभाव्य वाढ यांचा इशाराही एन पल्स देते. एखाद्या प्रकल्पाशी संबंधित प्रत्येक घटकाला याचा फायदा होतो. भारतातील गृहनिर्माण व्यवसायात डिजिटायझेशन आणण्याच्या प्रवासात यामुळे नवे मापदंड तयार होत आहेत, असे नधी चे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण वैद्यनाथन यांनी सांगितले. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love