दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग कोणी केला?

Who did the poison experiment on Dawood Ibrahim?
Who did the poison experiment on Dawood Ibrahim?

Dawood Ibrahim | Underworld Don  -मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील (Mumbai Chain Bomb blast )  मास्टर माईंड (Master Mind) दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्या मृत्यूची अफवा पुन्हा एकदा सोशल मिडियावर पसरली. यावेळी दाऊदवर पाकिस्तानातील कराची येथे विषप्रयोग (poison experiment) झाल्याची अफवा पसरली. मात्र, हे वृत्त निराधार असल्याचा निर्वाळा अधिकाऱ्यांनी दिला आहे. (Who did the poison experiment on Dawood Ibrahim?)

परंतु ,जेव्हा जेव्हा गँगस्टर दाऊद इब्राहिमचे (Dawood Ibrahim) नाव समोर येते तेव्हा त्याच्या भारताच्या हिन्दी चित्रपट सृष्टीशी (Hindi Film Industry)  अर्थात ‘बॉलीवूड’ (Bollywood) बरोबर असलेल्या घनिष्ठ संबंधांची चर्चा केली जाते.  दाऊद इब्राहिम हा एकेकाळी मुंबईतील ‘पॉवरफूल’  लोकांमधील एक नाव असलेला व्यक्ती म्हणून ओळखला जायचा.  90 च्या दशकात दाऊद इब्राहिमचा ((Dawood Ibrahim)  हिंदी चित्रपट सृष्टी ( (Hindi Film Industry)  )अर्थात ‘बॉलिवूड’मध्ये (Bollywood) मोठा दबदबा होता.  असे सांगितले जाते की,  त्याकाळी हिंदी चित्रपट सृष्टी आणि हिंदी चित्रपटात काम करणारे अभिनेते सुद्धा त्याच्या प्रभावाखाली होते.  बॉलीवूडचे ग्लॅमर आणि पैशाने दाऊदला आकर्षित केले होते.  त्यामुळे दाऊद चित्रपटांमध्ये पैसे लावत असल्याचे बोलले जात होते.  दाऊदची हिंदी चित्रपट सृष्टीतील मोठ्या स्टार्सबरोबर मैत्री आणि  त्यांच्याबरोबर उठणे बसणेही असायचे.

अधिक वाचा  #Amit Thackeray :‘बहिरोंको सुनाने के लीए धमाकेकी जरूरत है..' - अमित ठाकरे

एवढेच नाही तर दाऊदचे नाव हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक मोठ्या तारकांबरोबर जोडले गेले होते परंतु, या तारकांनी अशा वृत्तांना कधी सहमती दर्शविली नाही. यामध्ये एक तारका अशी होती जिला दाऊची गर्लफ्रेंड (Dawood Girlfriend म्हणून ओळखले जायचे आणि जिच्यावर हेरगिरी करण्याचे आरोपही झाले होते तीचं नाव अनिता अयुब (Anita Ayub).

पाकिस्तानी तारका (Pakistan Star) अनिता अयुब (Anita Ayub)  ही ८० दशकात भारतात आली होती.  हिंदी चित्रपटात काम करण्याची तिची इच्छा होती. अनिता अयुबचे नाव दाऊद इब्राहिम बरोबर जोडले गेले.  1993 मध्ये तेव्हाचे सुपरस्टार देवानंद (Deo Anand)  यांनी त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून अनिताला ‘लॉन्च केले.  तो पहिला चित्रपट होता ‘प्यार का तराना(Pyar Ka Tarana),’ त्यानंतर अनिता देवानंद यांच्याच 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गँगस्टर’(Gangstar) या चित्रपटात दिसली. त्यावेळी अनिता दाऊदबरोबर ‘डेट’ करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

अधिक वाचा  डिझायनर्सने एआयकडे एक समस्या म्हणून नव्हे तर साधन म्हणून पहावे – डॉन नॉरमन

याशिवाय अनिता आयुबने पाकिस्तानच्या अनेक टीव्ही शोमध्ये काम केले.  पाकिस्तानातील प्रसिद्ध असणाऱ्या तारकांपैकी अनिता एक होती. एवढेच नाही तर 1995 मध्ये अनिताला चित्रपट निर्माता जावेद सिद्दकी (Javed siddaki) याने त्याच्या चित्रपटात भूमिका देण्यास नकार दिला म्हणून दाऊदच्या सांगण्यावरून त्यांच्या गँगस्टर साथीदारांनी सिद्धकीची गोळ्या मारून हत्या केली होती. त्यावेळी हे प्रकरण चांगलेच गाजले होते.

अनिता अयुब 1990 च्या अखेरीस भारतीय व्यावसायिक सौमिल पटेल (Saumil Patel) याच्याशी विवाह बंधनात अडकली.  त्यानंतर ती त्याच्याबरोबर न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झाली. या दोघांना शजर (Shajar)  नावाचा एक मुलगा आहे.  काही वर्षानंतर अनिता सौमिल या दोघांचा घटस्फोट झाला आणि अनिता पाकिस्तानात परतली.  त्यानंतर तिने पाकिस्तानचे व्यावसायिक सुबक मजीद (Subak Majid) याच्याशी विवाह केला आता ते दोघेही परदेशात राहतात.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love