चॅनल पार्टनर्ससोबत उत्तम समन्वयासाठी क्रेडाई पुणे मेट्रोचे नवे पाऊल

Credai Pune Metro's new step for better coordination with channel partners
Credai Pune Metro's new step for better coordination with channel partners

पुणे- बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील चॅनल पार्टनर्सच्या भूमिकेचे महत्व अधोरेखित करण्यासोबतच त्यांच्या सोबतचा संवाद वाढविण्याच्या उद्देशाने क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने नुकतेच ‘डेव्हलपर टू चॅनल पार्टनर- डी टू सी कॉन्क्लेव्ह २०२४’ चे आयोजन करण्यात आले होते. प्रोफेशनल रिअल्टर्स ऑफ पुणे (पीआरओपी), नॅशनल असोसिएशन ऑफ रियल्टर्स (एनएआर), आणि इस्टेट एजंट्स असोसिएशन ऑफ पुणे (ईएएपी) यांचे विशेष सहकार्य या परिषदेला लाभले होते.तब्बल एक हजारांहून अधिक चॅनल पार्टनर्सनी या कॉन्क्लेव्हमध्ये आपला सहभाग नोंदविला हे विशेष.

या कॉन्क्लेव्ह दरम्यान पीआरओपीच्या वतीने महारेरा – एसआरओ अर्थात सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन होण्यासाठी आवश्यक नोंदणी मोहीम सुरू केल्या गेली आणि ती यशस्वीरित्या पूर्ण देखील करण्यात आली. पीआरओपीचे पुणे शहरात रेरा नोंदणीकृत सर्वाधित चॅनल पार्टनर सदस्य असल्याने ही नोंदणी महत्त्वपूर्ण ठरली.

अधिक वाचा  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण दाबण्यासाठी पूजाच्या आई-वडिलांना मिळाले 5 कोटी रुपये: पूजाच्या चुलत आजीचा खळबळजनक आरोप

या संदर्भात अधिक माहिती देताना क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजीत नाईकनवरे म्हणाले, “चॅनल पार्टनर्सच्या मदतीने मालमत्ता खरेदीदारांना प्रत्येक चॅनेल पार्टनरद्वारे स्वतंत्रपणे देण्यात येणाऱ्या ऑफर्स समजून घेवून त्याचा फायदा घेण्याची संधी मिळते. आम्ही अलीकडेच आयोजित केलेल्या क्रेडाई पुणे मेट्रोच्या पहिल्या डी टू सी कॉन्क्लेव्हमागे देखील नेमकी हीच कल्पना होती. याद्वारे विकसक आणि रिअल्टर्स /  चॅनल पार्टनर्स यांच्यातील सुसंवाद वाढवा यादृष्टीने एक नवीन व्यासपीठ विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. क्रेडाई पुणे मेट्रोने यावेळी पीआरओपीसह स्थापन केलेले हे सहकार्य बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील मैलाचा दगड ठरेल, शिवाय या क्षेत्राचे नियमन करण्यासोबतच त्यामध्ये पारदर्शकता आणणे आणि मालमत्ता खरेदीदारांना योग्य पद्धतीने सेवा देणे यासारख्या बाबींमध्ये आणखी पुढे जाता येईल असा आमचा विश्वास आहे.”

अधिक वाचा  तोंडाने म्हणायचं राम कृष्ण हरी.. आणि चतुर्थीला खायचं.. मटन करी.. : चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर टीका

या व्यासपिठाद्वारे विकसक आणि रिअल्टर्स अर्थात चॅनल पार्टनर्स यांमध्ये एकमेकांमध्ये  नेटवर्किग आणि सहकार्य करण्यास मदत होईल. चॅनल पार्टनर्सशी अशा पद्धतीने योग्य संवाद प्रस्थापित झाल्याने विकासकांना संभाव्य खरेदीदारांपर्यंत पोहोचणे सोपे होईल शिवाय चॅनल पार्टनर्सच्या ब्रँडची दृश्यमानताही वाढेल. चॅनल पार्टनर्सनीकडून बाजारातील महत्त्वाची माहिती आणि ग्राहकांचे अभिप्राय समजून घेणे विकासकांनाही सोपे जाईल. समन्वय समितीच्या माध्यमातून वाद मिटविणे व आपापसातील सुसंवाद वाढविणे, आणि क्रेडाई पुणे मेट्रोसारख्या संस्थेसोबत काम करणे आदी अनुभव देखील याद्वारे चॅनल पार्टनर्सला घेता येणार आहेत.

क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजीत नाईकनवरे, उपाध्यक्ष अरविंद जैन, एक्स्पोचे समन्वयक जे पी श्रॉफ, क्रेडाई पुणे मेट्रोचे सचिव अश्विन त्रिमल, क्रेडाई समिती सदस्य पुनीत ओसवाल, नॅशनल असोसिएशन ऑफ रियल्टर्स (एनएआर)चे माजी अध्यक्ष रवी वर्मा, प्रोफेशनल रिअल्टर्स ऑफ पुणे (पीआरओपी)चे अध्यक्ष दर्शन चावला, किशन मिलानी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love