Coronavirus vaccine:चीनलाही कोरोना लस बनविण्यात मिळाले यश,मानवी चाचणीच्या दुसऱ्या टप्प्याला यश मिळाल्याचा दावा


नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)–कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी लस बनविण्याची जगभरात स्पर्धा सुरु आहे. अनेक देश चाचणीच्या पहिल्या किंवा दुसर्‍या टप्प्यात आहेत तर बरेचजण अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. दरम्यान,  जिथून या विषाणूच्या प्रसाराला सुरुवात झाली त्या चीनकडूनही या लसीबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे.

चीनमधून पसरलेल्या कोविड-१९ या विषाणूमुळे आतापर्यंत जगात सहा लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर संक्रमित लोकांची संख्या जवळपास 1.46 कोटींवर पोहोचली आहे. मानवी चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात चीनची लस यशस्वी ठरली असल्याचे वृत्त प्रकाशित झाले आहे. ‘द लैंसेट’ या  मासिकामध्ये या चाचणीचे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले आहे. ही लस मानवासाठी सुरक्षित असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे. ही लस शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयुक्त असल्याचे सिद्ध होत आहे.

कशी आहे ही लस?

या चीनी लसीचे नाव Ad5 आहे. ‘द लैंसेट’च्या मासिकाच्या अहवालानुसार  वुहान या शहरातच या लसीची चाचणी घेण्यात आली, जिथून कोरोना विषाणू जगभर पसरला. या लसीच्या परिणामांचा प्रयोग सर्व वयोगटातील व्यक्तींवर केला गेला असून तपासणीत असे दिसून आले आहे की ही लस सर्व वयोगटातील कोरोना रूग्णांसाठी फायदेशीर आहे.

अधिक वाचा  अदर पूनावाला यांनी घेतला ‘कोव्हिशील्ड’ लसीचा डोस: लस सुरक्षित असल्याचा दिला संदेश

बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेक्नॉलॉजीच्या प्रोफेसर वेई चेन यांच्या मते, कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका वृद्ध लोकांचा असतो, कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते  किंवा त्यांना आधीच काही आजाराने ग्रासलेले असते. असे असताना, या लसीच्या दुसर्‍या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष चांगले आले आहेत. या लसीच्या मदतीने बरेच वृद्ध बरे झाले आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या शरीरात  प्रतिकारशक्तीही वाढली आहे.

चीनच्या एक वेबसाइटच्या मते, पहिल्या टप्प्यापेक्षा दुसर्‍या टप्प्यामध्ये  चार पट अधिक लोकांवर या लसीची चाचणी घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 108 निरोगी लोकांची चाचणी घेण्यात आली, तर   दुसऱ्या टप्प्यात, एकूण 508 लोकांची चाचणी घेण्यात आली. चीनच्या ‘जियांशु प्रोविंशियल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेंशन’ चे प्रोफेसर फेंगकाई झू यांच्या म्हणण्यानुसार 18 ते 55 वर्षे वयोगटातील लोकांना या चाचणीसाठी समाविष्ट केले गेले होते.

अधिक वाचा  जगाने सोडला निश्वास: चीनचे The Long March 5B रॉकेट कोसळले 'या'ठिकाणी

दरम्यान,  ब्रिटनलाही कोरोना लस तयार करण्यात मोठे यश मिळाले आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या कोरोना लसीच्या मानवी चाचण्यांना सकारात्मक परिणाम मिळाले आहेत. हे मानवासाठी सुरक्षित असल्याचे म्हटले जात आहे. मानवी चाचण्यांदरम्यान, शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की या लसीमुळे कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती (इम्यूनिटी) निर्माण झाली आहे. या लसीला ChAdOx1 nCoV-19 असे नाव देण्यात आले आहे.

एका अहवालानुसार ब्रिटनच्या या लसीच्या मानवी चाचण्यांमध्ये 1077 जणांचा समावेश होता. यामध्ये, ज्या लोकांना ही लस देण्यात आली, त्यांच्या शरीरात कोरोना विषाणूविरूद्ध लढणार्‍या पांढऱ्या पेशी आणि एंटीबॉडी तयार झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. या लसीच्या मानवी चाचण्यांसाठी आता मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार,  ब्रिटन सरकारने या लसीचे १० कोटी  डोस तयार करण्याचे आधीच आदेश दिले आहेत.

अधिक वाचा  लसिकरणाच्या गोंधळाला केंद्र सरकार जबाबदार- सिरम इंस्टिट्यूट

चीन आणि ब्रिटन व्यतिरिक्त 27 जुलैपासून अमेरिकेत एक मोठी मानवी चाचणी सुरू होणार आहे, ज्यामध्ये सुमारे 30,000 लोकांना लसीचे डोस देण्याचे लक्ष्य आहे. ही लस मानवी शरीरात कोरोना विषाणूंपासून प्रत्यक्षात रक्षण करू शकते की नाही हे या चाचणीद्वारे निश्चित केले जाईल. ‘नॅशनल इंस्टिट्यूट्स ऑफ हेल्थ और मोडेरना इंक’ मधील डॉ. फाउची आणि त्यांच्या सहकार्यांनी ही लस बनवली आहे.   

रशियानेही कोरोनाची लस बनविल्याचा दावा केला आहे. इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशनल मेडिसिन अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक वादीम तारासोव यांच्या मते, जगातील या पहिल्या कोरोना लसीची क्लिनिकल चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. जर सर्व काही व्यवस्थित झाले तर सप्टेंबरपर्यंत ही लस बाजारात उपलब्ध होईल, असा दावा केला जात आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

एक प्रतिक्रिया

Comments are closed.