‘वसुधैव कुटुंबकम’ अर्थात ‘हे विश्वची माझे घर’ असे भारतीय संस्कृतीत म्हटले आहे. संपुर्ण जग कोरोना या साथीच्या रोगाचा सामना करतो आहे.आजच्या या जागतिक संकटात आपण जाणतो की आपण प्रत्येकजण कसे एकमेकाशी जोडले गेले आहोत. आपण केवळ मानवाचेच नाही तर वनस्पती आणि प्राणी यांच्या सुरक्षेची काळजी घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे.
डच दृष्टीकोन
नेदरलँड्मध्ये कोरोनावर शक्य तितक्या लवकर जास्तीत जास्त नियंत्रिण मिळवणे, वृद्ध लोक आणि आरोग्याची स्थिति चांगली नसलेले लोक तसेच असुरक्षित गटांचे संरक्षण करणे हा दृष्टिकोण आहे. सरकारने बंदी घालण्यापासून सुरवातीपासुनच विवीध उपाय योजले आहेत. या उपायांचे लक्ष्य म्हणजे संक्रमणाने होण्याऱ्या कोरोनाव्हायरसचे प्रमाण कमी करणे आणि त्या संक्रमणांना अधिक विस्तारित कालावधीत न पसरविणे हा आहे. आरोग्य सेवा ही नक्कीच कोरोनाव्हायरसशी सामना करण्यास सक्षम असल्याचे हा दृष्टीकोन सुनिश्चित करतो.
नेदरलँड्समध्ये 27 फेब्रुवारी 2020 रोजी कोरोनाव्हायरसचा पहिला रूग्ण आढळला. त्यानंतर, रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली.कोरोनाव्हायरसने मार्च २०२० पासुनच नेदरलँड्समध्ये पकड धरली. नेदरलँड्समध्ये लागू केलेल्या कोरोनाव्हायरस उपायांबद्दल लोक कसे पाहतात याविषयी, त्या उपायांचे पालन करण्याची त्यांची प्रेरणा आणि त्यांच्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतो याबद्दल अंतर्दृष्टी मिळवण्यासाठी, आरआयव्हीएम (RIVM) नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पब्लिक हेल्थ आणि एनवायरनमेंट ( National Institute for Public Health and the Environment )आणि जीजीडी जीएचओआर (नेदरलँड्स म्युनिसिपल पब्लिक हेल्थ सर्व्हिसेस आणि अपघात व आपत्तींमध्ये वैद्यकीय सहाय्य)( GGD GHOR (the Netherlands Municipal Public Health Services and Medical Assistance in Accidents and Disasters) या विषयावर मोठ्या प्रमाणात अभ्यास करत आहेत. अजूनही काही महत्वपुर्ण उपाय आवश्यक आहेत जेणेकरून लोक एकमेकांचे संरक्षण करू शकतील.
लोक हे नियमांचे अनुसरण करीत आहेतच आणि त्याचा योग्य परिणाम दिसुनही येत आहे. परंतु परिस्थिती अद्यापही अटोक्यात नव्हतीच, म्हणून नोव्हेंबर २०२० पासुनच नेदरलॅंडने आंशिक लॉकडाउन सुरू केला होता.लोकांच्या प्रवासावर आणि एकमेकांशी संपर्क मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. तसेच मूलभूत नियमांचे पालन करणेही महत्वाचे आहे आणि या कठीण कालावधीत एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न करणे सुध्दा तितकेच आवश्यक आहे.
एनएल-अलर्ट (NL-Alert) कोरोनाव्हायरस प्रतिबंध नियम
कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मुख्य नियम लोकांना आठवण करून देण्यासाठी दि .रविवार 22 मार्च २०२० रोजीच सकाळी एनएल-अलर्ट (लोकांच्या मोबाइल फोनवर) पाठविला गेला होता. द हेग मधील नॅशनल क्राइसिस सेंटरने (National Crisis Centre in The Hague) हा-अलर्ट संपूर्ण नेदरलँड्समध्ये पाठविला होता.एनएल-अलर्टने पुन्हा एकदा कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी त्यांनी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याची आठवण करून दिली.
काय होता इशारा?
‘केंद्र सरकारच्या सूचनांचे अनुसरण करा, 1.5 मीटर’ अंतर ठेवा, आपण आजारी असल्यास किंवा सर्दी असल्यास घरीच रहा, स्वत: चे आणि आपल्या आसपासच्यांचे रक्षण करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, एनएल-सतर्कता बर्याच डिजिटल होर्डिंगवर आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी वेळी प्रदर्शित केले गेले. आपल्या सभोवतालच्या लोकांना मदत करा आणि त्यांना कळवा जेणेकरून त्यांना काय चालले आहे आणि काय करण्याची गरज आहे याची माहिती होईल. तसेच, प्रवास सल्लागाराच्या मते,अत्यावश्यक असल्यासच परदेशात प्रवास करा, अशा सूचना देण्यात आल्या.
कोरोना व्हायरसचा पुढील प्रसार रोखण्यासाठी असंख्य देश कठोर उपाययोजना करीत आहेत. आणखीन नवीन उपाय लागू केले जाऊ शकतात आणि परिस्थिती वेगाने बदलूही शकते.त्यामुळे शक्य असल्यास प्रवास टाळा असे सांगण्यात आले होते.
यापूर्वी ११ मे २०२० रोजी काही नियम शिथिल करून नेदरलँड्सने ‘लॉकडाऊन सुलभ करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले होते. त्यासाठी येथे कोविड -19 (तात्पुरते उपाय) अधिनियम )COVID-19 (Temporary Measures) Act) लागू केला होता.
सार्वजनिक ठिकाणे, संग्रहालये, रेस्टॉरंट्स आणि थिएटरसारख्या गर्दी होणाऱ्या ठिकाणी मास्क परिधान (compulsory face mask) करणे यासारख्या गोष्टी समाविष्ट होत्या.खेळास परवानगी होती, परंतु निर्बंध अद्यापही लागू आहेत.जसे 1.5 मीटर अंतराल ठेऊनच खेळांमध्ये भाग घेऊ शकतात. लोक वैयक्तिकरित्या किंवा 4 किंवा त्यातील गटांमध्ये खेळ घेऊ शकतात. सामने आणि स्पर्धांना परवानगी नाही मात्र अपवाद आहेतच.
कोरोना लसीकरण
सामान्य जीवन परत सुरळीत होण्याच्या दिशेने लसीकरण ही सर्वात महत्वाची पायरी आहे. नेदरलँड्सने 6 जानेवारी 2021 रोजी कोविड -१९ च्या विरूद्ध लोकांना लस देण्यास सुरुवात केली. ही लस वयं वर्ष १८ किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकास दिली जाईल. माननिय पंतप्रधान मार्क रुट्टे यांनी नेदरलँड्सला 5 चरणांत लॉकडाऊनमधून बाहेर काढण्याची नवीन योजना जाहीर केली आहे.
पंतप्रधान मार्क रुट्टे आणि आरोग्यमंत्री ह्युगो डी जोंगे यांनी जाहीर केलेल्या पाच-चरण योजनेत नेदरलँड्सला उन्हाळ्यात लॉकडाऊनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्नावर जास्त भर देण्यात आला आहे. 28 एप्रिलपासून पासुनच कॅफेचे टेरेस आणि आणखी दुकाने पुन्हा सुरू करण्यापासून आणि कर्फ्यूच्या निर्मूलनासह ही योजना सुरू झाली आहे. आणि जुलैच्या सुरुवातीस सर्व प्रौढ रहिवाशांना कोरोनाव्हायरस लसीचा कमीतकमी एक डोस मिळण्याची संधी उपलब्ध होईल या साठी सुध्दा योजना आखणी सुरू आहे.
याव्यतिरिक्त, लहान मुलांच्या सर्व पालकांना देखील त्यांच्या मुलांना शाळे-नंतरच्या डे केअरला पाठविण्याची परवानगी देण्यात येईल, असे डच सरकारने जाहीर करण्यात आले आहे. 26 एप्रिल पासुनच उच्च शिक्षण घेतलेले विद्यार्थी चार महिन्यांत प्रथमच वर्गात परतू शकले.
सरकारने आता स्टेप बाय स्टेप समाज जीवन पुन्हा सुरळीत सुरू करण्याचा आराखडा तयार केला आहे. परंतु हे सर्वस्व कोविड -१९ च्या पॅाझिटीव रुग्णांचे रूग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण किती यावर अवलंबून असणार आहे. प्रत्येकाने मूलभूत नियमांचे पालन करत राहणे देखील तितकेच महत्वाचे आहे. सतत हात धुणे, अंतर ठेवणे, चाचणी घेणे आणि लक्षणे आढळल्यास घरी राहाणे हे नियम संक्रमणास प्रतिबंध तर करतेच परंतु अधिक लवकर समाज जीवन सुरळीत होण्यासही उपयुक्त ठरणार आहे.
नेदरलँड्स घेत असलेल्या उपायांच्या निर्णयाचा समाज आणि अर्थव्यवस्थेवर महत्त्वपूर्ण परिणाम होत आहे. म्हणूनच सरकारने व्यावसायिक,कामगार आणि नोकरी शोधणाऱ्यांना आधार देण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या. ज्या लोकांना एकटेपणा वाटतो किंवा आर्थिक अडचणीत सापडलेल्या लोकांसाठी देखील मदत उपलब्ध करून दिली आहे. हे सरकार सरकारच्या पातळीवर उपाययोजना करत असताना आपण स्वत: निरोगी राहण्यासाठी आणि इतरांनी निरोगी रहावे यासाठी आपणही नियमांचे पालन करणे देखील महत्त्वाचे आहे.
सौ.प्रणिता अ.देशपांडे
द हेग, नेदरलँड्.
ई मेल:- [email protected]