#धक्कादायक: पुण्यात पुन्हा कोरोनाने घेतला एकाच कुटुंबातील चार जणांचा बळी;एकाच आठवड्यात दुसरी घटना


पुणे- आठवड्यापूर्वी पुण्यातील एकाच कुटुंबातील १५ दिवसात चार जणांचा कोरोनाने बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच अशीच हृदय पिळवटून टाकणारी घटना पुण्यात घडली आहे. पुणे महानगरपालिका हडपसर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कचरा व्यवस्थापन  कार्यरत असलेले श्यामसुंदर लक्ष्मण कुचेकर यांच्यासह कुटुंबातील ४ जणांचा ९ दिवसात करोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.

पुणे मनपा आरोग्य सेवेत श्यामसुंदर कुचेकर कार्यरत असतानाच आपली जबाबदारी पार पडत असताना  कुटुंबातील सर्वांना करोनाचा संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे.

वडील लक्ष्मण कुचेकर, आई सुमन कुचेकर, भाऊ विजय कुचेकर, यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील ४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

अधिक वाचा  #भंडारा दुर्घटना: दोषींना कडक शासन करू, कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही-अजित पवार

एका आठवड्यापूर्वी पुण्यातील जाधव कुटुंबातील चार जणांचा 15 दिवसांत कोरोनाने मृत्यू झाला होता.  आई अलका जाधव, भाऊ रोहित जाधव, अतुल जाधव आणि बहीण वैशाली गायकवाड यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. अवघ्या एका आठवड्यात संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब मृत्यूमुखी पडल्याने, कोरोनाचं भयाण रुप समोर येत आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love