कोरोनावर १०० टक्के रामबाण उपाय असल्याचे औषध सापडले? पुण्यातील डॉक्टरांचा दावा


पुणे(प्रतिनिधी)—राज्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असताना पुण्यातील कोथरूड भागातील डॉ. सारंग फडके या आयुर्वेदिक डॉक्टरांनी कोरोनावर औषध शोधल्याचा दावा केला आहे. त्यांनी शोधलेले औषध हे कोरोनावर १०० टक्के रामबाण उपाय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या औषधाबाबत गेल्या वर्षभरापासून आयुष मंत्रालयाशी संपर्क साधत असून त्यांना या औषधाची दाखल घेण्याची विनंती केली असल्याचे डॉ. फडके यांनी म्हटले आहे.

 डॉ. फडके यांनी गेल्या वर्षीपासून आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना हे औषध देत असून, हे रुग्ण बरे झाल्याचा दावा केला आहे. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांना हे औषध दिले असून, ते 100 टक्के कोरोनामुक्त झाल्याचा दावा डॉ. फडके यांनी केला आहे.1 वर्षांच्या मुलापासून 78 वर्षांच्या पेंशटला हे औषध देण्यात आले आहे. या औषधाला मान्यता मिळावी म्हणून डॉ. फडके हे गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाशी पाठपुरावा करत आहेत. मात्र अद्याप केंद्राने त्यांची दखल घेतली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा  नगरसेवक चंदू कदम यांच्यातर्फे राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरूडमध्ये मोफत लसीकरण मोहीम

हे औषध आयुर्वेदिक असून त्याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नसल्याचं डॉक्टरांचे म्हणणं आहे. त्यामुळे या औषधाला जर सरकारने मान्यता दिली तर कोरोना रुग्णांचा आकडा आणि मृत्यूदर कमी करण्यास मदत होईल असं डॉ. सारंग फडके यांचं म्हणणं आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love