#हिट अँड रन’ प्रकरण : दोन डॉक्टरांसह शिपायाला पाच जूनपर्यंत पोलीस कोठडी  

हिट अँड रन प्रकरणात रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी आणखी दोघांना अटक
हिट अँड रन प्रकरणात रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी आणखी दोघांना अटक

पुणे- कल्याणीनगर मधील अल्पवयीन आरोपीने केलेल्या कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन 17 वषीय आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील फॉर्नेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ अजय तावरे, डॉ श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे या तिघांना पाच जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

या तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्यावर ब्लड नमुने अहवाल बदलण्यासाठी पैसे घेतल्याने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कलमांडमध्ये वाढ करण्यात आली आहे. या तिघांनाही प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्र. पु. जाधव यांच्या न्यायालयासमोर गुरुवारी हजर करण्यात आले. त्या वेळी हे निर्देश देण्यात आले. तपास अधिकारी व सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे म्हणाले, सदर आरोपीस 27 मे रोजी अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायलयाने चार दिवस पोलीस कोठडी दिली होती. डॉ हाळनोर यांच्या ताब्यातून अडीच लाख रुपये, तर घाटकांबळे यांच्या ताब्यातून 50 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. डॉ. हाळनोर याने अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने घेतले व ते डस्टबीनमध्ये न टाकता कोणाला तरी दिले, त्यांचा शोध घेणे आहे. संशयित यांचे आरोपीसोबत व्हॉट्सअप कॉल झाले असून, त्याचा सहभाग निश्चित करून त्यांना अटक करणे आहे. मुलाचे जे रक्ताचे नमुने घेतले आहे, ते एका महिलेचे असल्याचे फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झाले आहेत. संबधित महिलेचा शोध घेणे आहे. डॉ. तावरे यांच्याकडून आर्थिक देवाण घेवाण केली आहे. त्यांच्या मालमत्तेची झाडाझडती घेणे आहे. 

अधिक वाचा  ‘दोषी मीच या समाजाचा, तूच मार्ग दाखव आता’:भजन-अभंग गायनात बंदीजन तल्लीन

सरकारी वकील नितीन कोंघे म्हणाले, आरोपीच्या पोलीस कोठडीत ससून रुग्णलयातील सीसीटीव्ही जप्त करण्यात आले. ते ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर आरोपीचा सहभाग निष्पन्न झाला आहे. ससून रुग्णालयातील रजिस्टर जप्त करण्यात आले असून, साक्षीदारांची नावे समोर आली आहेत. सीसीटीव्हीमध्ये आणखी काही जणांच्या संशयित हालचाली दिसून येत आहेत. दुसऱया महिलेचे रक्ताचे नमुने घेतले त्याचे सिरींज जप्त करणे बाकी आहे. अपघातग्रस्त गाडीची फॉरेन्सिक पाहणी करण्यात आली आहे. आरोपी विशाल आगरवाल याचा गुन्हय़ात सहभाग निष्पन्न झाला असून, त्यांना या गुन्हय़ात अटक करून आरोपी आणि त्यांची समोरासमोर ओळख परेड घेणे आहे.

बचाव पक्षाचे वकील विपुल दुशिंगे आणि ऋषिकेश गाणू म्हणाले, आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर घरझडती घेण्यात आली असून त्यात संशयित काही आढळले नाही. डॉ तावरे आणि डॉ हाळनोर सोबत काम करत असून त्यांचे एकमेकांत कॉल होणे संशयास्पद नाही. डॉ तावरे हे घटनास्थळी उपस्थित नव्हते केवळ फोन कॉलवरून त्यांना अडकवले गेले आहे. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love