Congress and Shiv Sena UBT alliance for Pune Municipal Election : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची युती

Congress and Shiv Sena UBT alliance for Pune Municipal Election
Congress and Shiv Sena UBT alliance for Pune Municipal Election

Congress and Shiv Sena UBT alliance for Pune Municipal Election :पुणे महानगरपालिका निवडणूक (Pune Municipal Corporation Election) काँग्रेस (Congress) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena UBT) एकत्र लढवणार असल्याची घोषणा ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर (Sachin Ahir) आणि काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे पुण्यात दोन राष्ट्रवादी (NCP), भाजप (BJP) व शिंदे गट (Shinde Faction) तसेच काँग्रेस व ठाकरेसेना अशी तिरंगी लढत  होण्याची शक्यता आहे.

पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्रितरीत्या लढणार आहेत. तर भाजप व शिवसेना शिंदे गटाची युती (Alliance) होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस व ठाकरे सेनेने एकत्र येत आपण निवडणुकीसाठी सज्ज असल्याचा संदेश दिला आहे. यासंदर्भात बोलताना पाटील म्हणाले, ‘काँग्रेस आणि ठाकरे गट पुण्यात एकत्र निवडणूक लढणार आहेत. १६५ नगरसेवक (Corporators) असलेल्या पुणे महानगरपालिकेत काँग्रेस ६० आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ४५ जागा लढवणार आहे. उर्वरित जागांबाबत पुन्हा चर्चा करून निर्णय घेतला जाईल. पुण्यात काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेलाही (MNS) सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासोबत (NCP Sharad Pawar faction) आमच्या दोन बैठका झाल्या. अंकुश काकडे (Ankush Kakade) यांच्याशीही माझी चर्चा झाली. आम्ही गाफील नव्हतो, दक्ष होतो. बॅकडोअर चर्चा  सुरू होती,’ असेही त्यांनी सांगितले. काँग्रेसकडे वंचितनेही प्रस्ताव पाठविला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अधिक वाचा  The NCP Ajit Pawar group and the NCP Sharad Pawar group have finally come together : राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अखेर अखेर एकत्र

आमच्यासाठी पुणेकरांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. पुणेकर ज्या समस्यांना तोंड देत आहेत, त्या सोडवण्याकडे आमचा कल असणार आहे. येत्या ४ ते ५ दिवसात आमचा जाहीरनामा (Manifesto) प्रसिद्ध होईल, असेही सतेज पाटील यांनी या वेळी सांगितले.

मनसे , रासप  सोबत चर्चा सुरू : सचिन अहिर अहिर म्हणाले, ‘आमचा जागा वाटपाचा फॉर्म्युला  ठरला आहे. मनसे, रासप व इतर पक्षांसोबत आमची चर्चा सुरू आहे. मनसेने आम्हाला ३२ नावांची यादी दिली होती. ती नावे कमी करून २१ जणांची अंतिम यादी आम्हाला मिळाली आहे. त्यावर चर्चा करणार आहे. विरोधातले सगळे पक्ष आमच्यासोबत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत आम्ही जाणार नाही हे आधीच सांगितले होते. अजित पवार (Ajit Pawar) हे दर आठवड्याला कॅबिनेटला (Cabinet) बसतात. त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे, मग आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा: अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावे लागेल

पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी महायुतीला (Mahayuti) रोखण्यासाठी कंबर कसली असून, दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील आणि शिवसेनेचे सचिन अहिर यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत या आघाडीची अधिकृत घोषणा केली. गेल्या सात वर्षांतील भाजप आणि महायुतीच्या कारभाराने पुण्याचे ‘वाटोळे’ झाले असून, पुणेकरांना एक सक्षम पर्याय  देण्यासाठी ही युती करण्यात आल्याचे नेत्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) या आघाडीत स्थान न देण्याबाबत भूमिका स्पष्ट करताना अहिर म्हणाले की, जे पक्ष सत्तेत राहून पुन्हा विरोधी पक्षाची जागा घेऊ पाहत आहेत, त्यांना पुणेकर थारा देणार नाहीत. अजित पवार गटाने आधी सत्तेतून बाहेर पडावे, मगच त्यांच्याशी चर्चेचा विचार होऊ शकला असता, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) यांच्याशी काही जागांबाबत स्वतंत्रपणे चर्चा सुरू असून, लवकरच त्याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू आहेत-चंद्रकांत पाटील

पुणेकरांसाठी येत्या ४ किंवा ५ तारखेला दोन्ही पक्षांचा संयुक्त जाहीरनामा  प्रसिद्ध केला जाणार आहे. यामध्ये हिंजवडी आयटी पार्कचा (Hinjewadi IT Park) प्रश्न, वाहतूक कोंडी, आणि महापालिकेचे हिरावले जाणारे अधिकार यांवर विशेष मास्टर प्लॅन  मांडला जाणार आहे. निवडणुकीसाठी वेळ कमी असल्याने मोठ्या सभा घेण्याऐवजी रॅली आणि प्रत्यक्ष जनसंपर्कावर  अधिक भर देण्याची रणनीती काँग्रेस-शिवसेनेने आखली आहे. सत्तेपेक्षा पुणेकरांचे प्रश्न सोडवणे हीच आमची प्राथमिकता असेल, असा विश्वासही दोन्ही नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love