श्रीनाथ भिमाले यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या मतदार नोंदणी व मुख्यमंत्री लाडकी बहीण अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

श्रीनाथ भिमाले यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या मतदार नोंदणी व मुख्यमंत्री लाडकी बहीण अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
श्रीनाथ भिमाले यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या मतदार नोंदणी व मुख्यमंत्री लाडकी बहीण अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे(प्रतिनिधि)–राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारने महिलांसाठी खास योजनेची घोषणा केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये महिलांना दर महिन्याला १५०० रूपये मिळणार आहेत. याच पार्श्भूमीवर श्रीनाथ भिमाले यांच्यावतीने पर्वती विधानसभा मतदारसंघात सुरू करण्यात आलेल्या मतदार नोंदणी आभियान व मुख्यमंत्री लाडकी बहीण अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या अभियानाला दिनांक ८ जुलै पासून सुरुवात झाली असून १४ जुलै पर्यंत सुरू राहणार आहे. पर्वती विधानसभा मतदार संघामध्ये ३० ठिकाणी हा उपक्रम सुरू असून मतदार नोंदणी सुरू आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन फॉर्म भरायचा असला तरी या ३० ठिकाणी कार्यकर्ते नागरिकांचे ऑफलाइन फॉर्म भरून घेत आहेत व नागरिकांना ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी सर्वोतोपरी मदत करत असल्याचे चित्र या भागात फिरताना दिसून येत आहे. नाव नोंदणीमध्ये गरीब, कष्टकरी महिला या अभियानाच्या माध्यमातून वरील दोन्ही योजनेसाठी उपलब्ध करून दिलेल्या फॉर्म भरण्याच्या सुविधेचा लाभ घेत आहेत.

अधिक वाचा  अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर: काय म्हणाले पवार?

दरम्यान, गेल्या सोमवार पासून( दि. ८ जुलै) सुरू झालेल्या या अभियाना दरम्यान, ३० पैकी साधारण २५ ठिकाणी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आज पर्यंत मतदार नोंदणी आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे १५००-२००० नागरिकांचे फॉर्म भरले आहेत. अभियांन संपेपर्यंत या दोन्ही योजनेचे पाच-पाच हजार नागरिकांचे फॉर्म भरण्याचे उद्दीष्ट असल्याचे श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

येत्या रविवारपर्यंत (दि. १४ जुलै)  हे अभियान सुरू राहणार आहे. मतदार यादीतून ज्यांचे नाव डिलिट झाले आहे त्यांचे नाव नोंदवा तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी सुरू असलेल्या या मोफत सुविधेचा जास्तीत जास्त  नागरिकांनी फायदा घ्यावा असे आवाहन भिमाले यांनी पर्वती मतदार संघातील नागरिकांना केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love