खंडणी प्रकरणी गँगस्टर छोटा राजनच्या पुतणीला साफळा रचून अटक

Union Minister Muralidhar Mohol's office employee brutally beaten up
Union Minister Muralidhar Mohol's office employee brutally beaten up

पुणे- “मी गॅंगस्टर छोटा राजनची सख्खी पुतणी असून त्यांचा व माझा डीएनए एकच आहे, जीव प्यारा असेल तर पन्नास लाख रुपये दे” असे म्हणून एका व्यक्तीकडे खंडणी मागणाऱ्या आणि एक वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात गॅंगस्टर छोटा राजनच्या पुतणीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने साफळा रचून अटक केली आहे.

प्रियदर्शनी प्रकाश निकाळजे (वय 36, अनिता अपार्टमेंट, जांभुळकर चौक, वानवडी) असे तिचे नाव आहे. राजनची पुतणी असल्याचे सांगून धमकी देत तिने 25 लाखांची खंडणी मागितली होती. लष्कर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  प्रियदर्शनी निकाळजे हिने “मी गॅंगस्टर छोटा राजनची सख्खी पुतणी असून त्यांचा व माझा डीएनए एकच आहे, जीव प्यारा असेल तर पन्नास लाख रुपये दे” असे म्हणून एका व्यक्तीकडे खंडणी मागितली होती. तेव्हा संबंधित व्यक्तीने लष्कर पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून 25 लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना प्रियदर्शनी निकाळजे हिचा साथीदार धीरज साबळे याला रंगेहात पकडले होते. तर, प्रियदर्शनी फरार झाली होती.

अधिक वाचा  कापड व्यापाऱ्यांकडे खंडणी मागितल्या प्रकरणी भाजपच्या माजी उपमहापौराला अटक

दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरू असताना प्रियदर्शनी ही वानवडी येथील आपल्या राहत्या घरी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तिला अटक केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love