नोकरी गेलेल्या पत्रकारांना केंद्र सरकार सेवेत सामावून घेणार ?


नवी दिल्ली – केंद्र सरकार आपल्या प्रसारमाध्यम आणि सार्वजनिक प्रचारात सुधारणा करण्यासाठी एक नवे धोरण आखत आहे. यासाठी नऊ केंद्रीय मंत्र्यांचा गट (जीओएम) स्थापन करण्यात आला असून, या मंत्री गटाने 10 महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याची शिफारस केली आहे.


हिंदुस्थान टाइम्स या वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या एका वृत्तानुसार, प्रदीर्घ चर्चेदरम्यान सरकारी दळणवळण, प्रसारमाध्यमांच्या सहभागाद्वारे संदेश वहनासाठी बहुआयामी धोरण विकसित करणे, राज्ये आणि जिल्ह्यांच्या पातळीवर प्रचार कार्यक्रम विकसित करण्यासाठी विचार विनिमय करून ह्या शिफारसी करण्यात आहेत.   


या सूचनांमध्ये देशातील एक प्रमुख वृत्तसंस्था म्हणून प्रसार भारती वृत्तसेवा विकसित करणे आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय सार्वजनिक प्रसारकांच्या धर्तीवर डीडी इंटरनॅशनल वृत्त वाहिनी विकसित करण्याच्या प्रस्तावाचा देखील समावेश आहे.  त्याप्रमाणेच मंत्रिगटाने  अलीकडेच आपल्या नोकऱ्या गमावलेल्या पत्रकारांची ओळख पटवण्याचा प्रस्ताव मांडला असून, जे पत्रकार सरकारला पाठिंबा देणारे किंवा तटस्थ आहेत, त्यांच्या सेवांचा उपयोग विविध मंत्रालयांकडून करण्यासाठी ही शिफारस केली आहे.  

अधिक वाचा  #Pune Public Policy Festival : शहरी शाश्वतता, ऊर्जा शाश्वतता यांचा किफायतशीर पद्धतीने मिलाफ घडवण्याचा प्रयत्न- हरदीपसिंग पुरी

मंत्रिगटात कॅबिनेट मंत्री रविशंकर प्रसाद, स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर, एस जयशंकर, मुख्तार अब्बास नक्वी आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, हरदीपसिंग पुरी, अनुराग ठाकूर आणि बाबूल सुप्रियो यांचा समावेश आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love