पुणे : जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम राजा राम.. च्या जयघोषात ‘शैक्षणिक भ्रष्टाचारा’चा रावण आज दहन करण्यात आला. मातृशक्ती प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने कोथरूड येथील स्वा. वि. दा. सावरकर मैदान, उजवी भुसारी कॉलनी येथे हा रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी अनेक विद्यार्थी व पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदा या कार्यक्रमाचे आठवे वर्षे होते.
अन्याय आणि अंहकाराचे प्रतिक म्हणून रावणाच्या पूतळ्याचं दहन केलं जातं. या पार्श्वभूमीवर ‘चला, समाजातील वाईट प्रवृत्तींचे विविध सामाजिक प्रश्नांचे दहन करू या, आपली ऐतिहासिक परंपरा जोपासू या!’ या संकल्पनेनुसार नव्या पिढीला हिंदू धर्मातील परंपरेचे महत्व पटूवन देण्याच्या उद्देशाने हे रावण दहन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचे प्रतीकात्मक रावण दहन करण्यात आले. यावेळी आयोजक महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख राज्य संघटक प्रशांत कनोजिया, माजी नगरसेविका पुष्पा कनोजिया, मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मनसेचे नेते वसंत मोरे, माजी नगरसेवक किशोर शिंदे, महाराष्ट्र उपाध्यक्ष ॲड सचिन पवार, कार्यकारणी सदस्य रुपेश घोलप, क्रीडा अध्यक्ष महेंद्र जाधव, माथाडी सेना राहुल वाघवले, विद्यार्थी सेना अध्यक्ष ॲड अमेय बलकवडे आणि वॉल्स ग्रुप मित्र परिवार उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख राज्य संघटक प्रशांत कनोजिया म्हणाले, हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा. विजयाची प्रेरणा देणारा आणि छात्रवृत्ती जागृत करणारा हा सण. आज समाजात शैक्षणिक भ्रष्टाचार, लाचखोर, बलात्कारी, निर्दयी, धर्मांध, लव्ह जिहादी आतंकवादी तसेच शिक्षणच काय, वैद्यकीय क्षेत्रातील वाढती लुटमारी अशा अनेक वाईट प्रवृत्ती वाढत आहेत. त्याला कुठे तरी कायमचा आळा बसला पाहिजे आणि आपल्या नव्या पिढीला हिंदू धर्मातील परंपरेची माहिती व्हावी, त्यांनी त्या दिशेने जीवनात मार्गक्रमण करावे या उद्देशाने या रावण दहणाचे आयोजन करण्यात आले.
रावण दहन कार्यक्रमापूर्वी स्वच्छंद प्रस्तुत ‘राम घ्यावा, राम द्यावा’ हा भजनांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.