कल्याणीनगर ‘हीट अँड रन’ प्रकरण : फरार बिल्डर विशाल अग्रवाल यांना संभाजीनगर येथून अटक

Vishal Aggarwal remanded in police custody till May 24
Vishal Aggarwal remanded in police custody till May 24

पुणे- पुण्यातील कल्याणीनगर परिसरात शनिवारी मध्यरात्री झालेल्या ‘हीट अँड रन’ प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील पुण्यातील बडे बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी संभाजीनगर येथून अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर ते फरार झाले होते.

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात शनिवारी मध्यरात्री वेदांत चालवत असलेल्या भरधाव वेगातील पोर्शे कारने  दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा (रा. मध्य प्रदेश) नावाच्या तरुण-तरुणीला चिरडले. कारच्या धडकेमुळे दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी हवेत काही फूट उडून रस्त्यावर आदळली; तर दुचाकीस्वार तरुण दुचाकीसोबत काही अंतर फरफटत गेला. यामध्ये दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता. त्यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला.

अधिक वाचा  पूजा वनदुर्गांची : अन्नमाता ममताबाई भांगरे

विशाल अग्रवाल यांचा मुलगा हा अल्पवयीन होता. त्याने पोर्शे कारने अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना चिरडल्यानंतर   पुण्यात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता. यानंतर पोलिसांनी विशाल अग्रवाल यांच्यावरही गुन्हा दाखल केला होता. मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार (Porsche car) चालवायला दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर मोटर वाहन अधिनियमाच्या कलम ३, ५ आणि १९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तसेच आपला अल्पवयीन मुलगा दारू पितो हे ठाऊक असूनही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर बाल न्याय अधिनियमनाच्या कलम ७५ आणि ७७ अंतर्गत आखणी एक गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे विशाल अग्रवाल यांच्या अडचणी वाढल्या होत्या. यानंतर ते फरार झाले होते. यानंतर पुणे पोलिसांनी त्यांच्या तपासासाठी अनेक पथकं तयार केली होती. अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पहाटे छत्रपती संभाजीनगरमधून विशाल अग्रवाल यांना ताब्यात घेतले. विशाल अग्रवाल यांना आता दुपारपर्यंत पुण्यात आणण्यात येईल. विशाल अग्रवाल यांच्यावर अटकेची कारवाई केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाईल.

अधिक वाचा  धक्कादायक: उतारवयात जेष्ठांमध्ये विभक्त होण्याचे प्रमाण वाढले : काय आहेत कारणे?

#Builder Vishal Aggarwal arrested from Sambhajinagar

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love