कायद्यावर आधारीत न्यायव्यवस्था आणणं हे भारतात खूप मोठं अवघड काम आहे- अरुंधती राय


पुणे- एल्गार ही बेकायदेशीर नाही, संविधानविरोधी काम करणारी नाही, दंगली भडकावण्याचं काम आम्ही करत नाही, इतरांसारखे आम्ही एकमेकांना आपापसात लढायला लावत नाही. भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी अटकेत असलेल्यांची मी चांगली सहकारी आहे,  त्यांनी कोणती चूक केली आहे असे मला वाटत नाही,  त्यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही तरी हजारो पानांचे चार्जशीट दाखल केलं गेलं ,कायद्यावर आधारीत न्यायव्यवस्था आणणं हे भारतात खूप मोठं अवघड काम आहे असे वक्तव्य प्रसिद्ध लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती राय यांनी केले.

 पुण्यात आयोजित एल्गार परिषदेत त्या बोलत होत्या,

शेतकरी आंदोलनावरून त्यांनी केंद्र सरकार वर ही टीका केली या आंदोलनाला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत खर तर सरकारने हा कायदा मागे घ्यायला हवा असे राय म्हणाल्या. पेशवे गेले मात्र अजूनही पेशवाई गेली नाही,  जातींवर निंयत्रण ठेवण्याचं काम ब्राम्हणवाद करतो, याच पुणे शहरात पुणे करार झाला तेव्हा आंबेडकरांना ब्लॅकमेल करून पुणे करार केला गेला असे वक्तव्य देखील राय यांनी यावेळी केले.

जातीवाद, धर्माची सर्कस अजून संपलेली नाही. आजही जाती, धर्माच्या दहशतीखाली सत्ता गाजवली जात आहे. आपल्याला एका संकुचित विचारसरणीत अडकवून ठेवले जात आहे. याविरोधात आपल्याला एकजुटीने लढा उभारावा लागेल. ही अस्तित्वाची लढाई आहे. आरएसएस विरुद्ध सत्यशोधक रेझिस्टन्स ताकद उभी करावी लागेल, असे आवाहनही अरुंधती रॉय यांनी  केले.

अधिक वाचा  गैरसोयीच्या माणसाचा घोटाळा बाहेर काढायचा अन सोयीच्या माणसाचा झाकून ठेवायचा- राजू शेट्टी

विषम जाती व्यवस्थेविरोधात संघर्ष करण्यासाठी आपले विचार व्यक्त करण्यासाठी 31 डिसेंम्बर 2017 ला कोरेगाव भीमा शौर्य दिनाचे औचित्य साधून पुण्यातल्या शनिवरवाड्या वर एल्गार परिषद झाली होती त्यानंतर तीन वर्षानंतर पुन्हा एकदा एल्गार परिषद पुण्यात आयोजित करण्यात आली होती 30 जानेवारीला पुण्यातल्या गणेश कलाक्रीडा मंच मध्ये दिवस भर या परिषदेचे आयोजन करणयात आले. या परिषदेला प्रसिद्ध लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती राय सहभागी झाल्या होत्या, तसेच पंजाब मधील शेत मजुरांसाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते बंत सिंग, जामिया मधील विद्यार्थी नेता आयेशा रेन्ना, पत्रकार प्रशांत कनोजिया यांच्या सह विविध सामाजिक कार्यकर्ते या परिषदे मध्ये सहभागी झाले होते..यावेळी विविध वक्त्यांनी सध्याच्या राजकीय सत्तेवर कडाडून प्रहार केला.

आपल्या पदाचा राजीनामा देणारे केरळ मधील आयपीएस अधिकारी  कन्नन गोपीनाथ हे देखील एल्गार परिषदेला उपस्थित होते आपल्या भाषणात त्यांनी सध्याचे राज्यकर्ते आणि जनतेच्या मानसिकतेवर भाष्य केले,, ये सरकार फॅसिस्ट  बनना चाहते है मगर है तो बेवकुफ, सरकारला प्रश्न विचारले तर तुम्ही तुकडे तुकडे गँग झालात आता आंदोलक शेतकऱ्यांना देखील अशाच प्रकारे बदनाम केले जातेय व अशी जोरदार टीका कन्नन यांनी केली.भारतीय राजकारणात चाणक्याची गरज काय, राजे राजवाडे च्या काळात प्रजेला कंट्रोल करण्यासाठी चाणक्याची गरज होती आता लोकशाही आहे आपण नागरीक आहोत अशा चाणक्याची गरज नाही असे सांगत देशातएक मोदी नाही ठिकठिकाणी मोदी आहेत, आम्हीं प्रश्न विचारायला घाबरतो, आम्ही नागरिक म्हणुन वागत नाही आपल्या हक्कासाठी लढत नाही आज प्रजा म्हणूनच आपण वागतो.आपल्याला बोलण्याची आजादी हवी..प्रजे पासून नागरिक बनण्याचा प्रवास या देशासाठी आवश्यक आहे असे कन्नन गोपीनाथन म्हणाले.  

अधिक वाचा  शरद पवार यांचे देशपातळीवरील काम आणि आदराची भावना या सर्वांचा विचार करून नवीन पीढीने बोलले पाहिजे- अजित पवारांचा फडणविसांना टोला

सध्याचे सत्ताधारी हे भगवे दहशतवादी  आहेत असा घणाघात विद्यार्थी नेता आयेशा रेन्ना यांनी केला, विद्यापीठातील ब्राह्मणवादी व्यवस्थेचा दलित बहुजन आणि मुस्लिम बळी ठरत असल्याचे वक्तव्य केले तसेच केंद्र सरकार आणि आरएसएस वर टीका केलीत तर माजी पोलीस अधिकारी एस.  एम.  मुश्रीफ यांनी आपल्या भाषणात विषमता वादी ब्राम्हणवादी व्यवस्थे विरोधात आमचा हा एल्गार आहे असे सांगत, ब्राम्हणवादी व्यवस्थे विरोधात  वर्षनुवर्षं पासून आंदोलन विरोध सुरू आहेत पण  ब्राम्हणवादी त्याला गंभीर पणे घेत नव्हते मात्र 2017 ला झालेल्या एल्गार परिषदेने यांची झोप उडाली आणि त्यामुळेच आयबीने या प्रकरणात कारवाई केली असे मत निवृत्त पोलीस अधिकारी एस. एम.  मश्रीफ यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले..आयबी वर पूर्णपणे ब्राम्हणवाद्याचे वर्चस्व आहे त्यांनी एल्गार परिषदेतील काही वक्तव्य घोषणावरून गुन्हे दाखल करण्यात आले असे मुश्रीफ म्हणाले.

अधिक वाचा  #पुणे हिट अँड रन प्रकरण :  ‘मृत तरुण-तरुणीने मद्यपान केल्याचे दाखविण्याचा प्रयत्न- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा खळबळजनक आरोप

एमडी चे शिक्षण घेत असताना रॅगिंग ची बळी ठरलेली पायल तडवी यांच्या आई आबिदा तडवी देखील या एल्गार परिषदे त सहभागी झाल्या होत्या, पायल अनेक स्वप्न घेऊन मुंबईत आली होती, आमच्या आदिवासी समाजातील पहिली एमडी डॉकटर ती झाली असती मात्र मनुवादी समाजव्यवस्थेची ती बळी ठरली अशी वेदना नायर रुग्णालयात एमडी साठी प्रवेश घेतलेल्या आणि तिथल्या रॅगिंग ला बळी ठरलेल्या पायल तडवी ची आई आबिदा तडवी यांनी व्यक्त केली.  ही एल्गार परिषद सहा सत्रात घेण्यात आली, विविध वक्त्याच्या भाषणा सोबत समता कला मंच , कबीर कला मंच, पराई हा तामिळनाडूतील सांस्कृतिक कला ग्रुप देखील सहभागी झाला होता

यंदाच्या वर्षापासून एल्गार पुरस्कार देण्यास सुरुवात झाली असून यावर्षी सामाजिक कार्यकर्ते किशोर कांबळे यांना हा पुरस्कार देण्यात आला…

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love