पुणे- भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असतांना ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यासाठी कर्वेनगर येथील निरामय योग चिकित्सा केंद्र व जागृती प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने “भारत माँ की जय हो” हा नाट्य अभिवाचन प्रयोग सांगीतिक रित्या ‘निरामय योग चिकित्सा केंद्र’च्या सभागृहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त) हे उपस्थित होते.ते आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले,”कुलदीप धुमाळे लेखक,दिग्दर्शक व अभिवाचक असलेल्या ‘जागृती प्रतिष्ठान’ ने सन १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यापासून १९४७ दुसऱ्या व यशस्वी लढ्यातील काही क्रांतिकारकांचा धावता आलेख अतिशय उत्तमरित्या सादर केला ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या आयुष्याची आहुती दिली,बलिदान दिले त्यांचे स्मरण रहावे व नव्या पिढीने खरा इतिहास समजून घ्यावा,आपल्या देशाचा जाज्वल्य इतिहासाचे स्मरण व्हावे,पुर्वजांचे शौर्य व पराक्रम माहिती करून देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यासाठी असे नाट्यप्रयोग सर्व शाळांमध्ये सादर करावे ज्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची जागृती निर्माण होईल” असे प्रतिपादन प्रदीप बापट यांनी केले.
कार्यक्रमास एअर व्हाइस मार्शल जयंत इनामदार ( निवृत्त ),एअर कमोडर अरुण इनामदार( निवृत्त ),राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्वेनगर संघचालक उदयन पाठक,नगरसेविका मिताली सावळेकर ह्यांची मुख्य उपस्थिती होती.
कुलदीप धुमाळे यांनी ह्या स्वातंत्र्यलढ्यातील रोमांचित करणारे प्रेरक प्रसंग ह्या नाट्य अभिवाचन द्वारे रसिकांसमोर सादर केले.या कार्यक्रमास डॉ ओंकार धुमाळे,दत्ता काळे,अरुंधती धुमाळे,या कलाकारांची उत्कृष्ट साथ होती.नेपथ्य प्रकाश माधव जोशी व बालाजी शिंदे ह्यांचे होते.स्वातंत्र्य लढ्यातील रोमांचित करणारे प्रेरक प्रसंग व राष्ट्रभक्तीपर गीते सादर करण्यासाठी अतिशय सुंदर ह्यांनी साथ दिली.नेताजी सुभाषचंद्र बोस,शहीद भगतसिंग,लोकमान्य बाळ गंगाधर टिळक,तात्या टोपे,वासुदेव बळवंत फडके,झांशीची राणी,सरदार वल्लभभाई पटेल,स्वातंत्र्यवीर सावरकर,मदनलाल धिंग्रा,गोपाळ गणेश आगरकर,आदी क्रांतिकारकांच्या कार्यांवर गीताद्वारे व अभिवाचन द्वारे प्रकाश टाकण्यात आला.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ‘जागृती प्रतिष्ठान’चे अध्यक्ष कुलदीप धुमाळे यांनी शाल,रोप देऊन केले.कार्यक्रमाची सुरवात अरुंधती धुमाळे ह्यांच्या ईशस्तवनाने झाली.सूत्रसंचालन प्रकाश देशपांडे यांनी केले.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमास दीनदयाळ शोध संस्थानचे गणेश पाठक,निरामय चे उमेश होले,कर्वेनगर,कोथरूड, वारजे भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक,नागरिक,योग साधक, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.