बहुजन समाजाने उद्योग जगात स्थान निर्माण करावे- पद्मश्री मिलिंद कांबळे


पुणे — सद्ध्या परिस्थिती अत्यंत वेगळी आहे ,नोकऱ्या कमी होत आहेत ,बेकारी वाढत आहे. अशा वेळी बहुजन समाजाने छोटे ,मोठे उद्योग उभारून या  व्यवसायात आपले स्थान निर्माण करावे असे मत आय.आय.एम.चे अध्यक्ष व दलीत इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इण्डस्ट्री चे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले.

 कुकर व्यवसायात भारताला पेटंट मिळवून स्मार्ट कुकरची संकल्पना अस्तित्वात आणणाऱ्या   प्रवीण कांबळे ,विजय मोहिते आणि स्वाती कानडे या  पुणेकरांनी निर्माण केलेल्या अनेकम कुकवेर या उत्पादनचे  उद्घाटन मिलिंद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

 कांबळे म्हणाले की,सतत दोन वर्ष संघर्ष करून या तिघांनी हे उत्पादन सुरू केले आहे .शिवाय याला पेटंट मिळवून त्यांनी मोठे स्वप्न साकार केले आहे .मराठी माणूस उद्योग मध्ये यशस्वी होत नाही हा गैरसमज यांनी दूर केला आहे .शिवाय नुकत्याच स्टार्ट अप इंडियाच्या निवडीमध्ये  60 हजार  नव उद्योजक सहभागी झाले त्यात 38 हजार निवडले .त्यामध्ये 18 हजार मराठी उद्योजक निवडले गेले आहेत. म्हणजे आता मराठी माणूस उद्योग व्यवसायात ही पुढे आहे असे कांबळे यांनी सांगितले . 

अधिक वाचा  मोहोळांची प्रचारात आघाडी : विविध क्षेत्रातून मिळतोय उत्स्फूर्त पाठींबा

 प्रवीण कांबळे,  विजय मोहिते ,स्वाती कानडे या तीन नव उद्योजकांनी  दलीत इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री व मिलिंद कांबळे यांच्या सहकार्यातून व मार्गदर्शनामुळे  आम्ही आज उभे आहोत अशी भावना व्यक्त केली.   त्यांनी या स्मार्ट कुकर संकल्पना सांगितली यामध्ये सुमारे 40  पदार्थ बनविले जातात.त्यामध्ये केक,ब्रेड,पुलाव ,विवध प्रकारचे फ्राय शिवाय भाजी आणि इतर प्रकारे सर्व वस्तू एकत्र बनविणारे हे पहिलेच उत्पादन असून हे लाइ टवर चालात आहे .शिवाय हे येत्या महिन्याभरात सर्वत्र उपलबध होणार असल्याचे सांगितले .

 यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ मुकुंद देशपांडे , पोलिस अधिकारी प्रेमा पाटील ,अनिल होवाळे ,क्षत्रिय मराठा संस्थेचे वैभव पाटण, रिपबलिकान महिला प्रमुख संगीता आठवले ,तसेच दलीत इंडियन चेंबर चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love