उरवडे येथील रासायनिक कंपनीला लागलेल्या भीषण आगीत 18 जणांचा होरपळून मृत्यू: 15 महिलांचा समावेश?


पुणे-पिरंगुट एमआयडीसी परिसरात पौड रस्त्यावरील घोटवडे फाट्याजवळील उरवडे रोड येथील  एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस svs aqua technologies  या रासायनिक कंपनीला आ कंपनीला आग लागून 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  मृतांमध्ये 15 महिलांचा समावेश आहे.  मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आग लागली त्यावेळी कंपनीत 37 कामगार होते अशी प्राथमिक माहितीत समोर आले आहे. आग कशामुळं लागली हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.

दरम्यान, कंपनीत आग लागली आणि काहीवेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीमुळे प्रचंड धुराचे लोट परिसरात पाहायला मिळत होते. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दल तसेच पीएमआरडीएचे बंब घटनास्थळी दाखल झालेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, कुलिंगचे काम सुरू आहे. मात्र, या घटनेत 20 कामगारांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.यामध्ये प्रामुख्याने महिला कामगारांचा समावेश आहे. आणखी काही कामगार अडकले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.

अधिक वाचा  पुणे कॅम्पमधील फॅशन स्ट्रीटला भीषण आग : ५०० पेक्षा जास्त दुकाने जळून खाक

घटनेची माहिती मिळाल्यावर पुणे महापालिका आणि पीएमआरडीएच्या अग्निशमक दलाच्या गाड्या तातडीने रवाना झाल्या. मात्र, सॅनीटायझर बनविले जात असल्याने आगीने थोड्याच वेळात रौद्र रुप धारण केले होते. स्थानिक ग्रामस्थांनीही तातडीने धाव घेतली. घटनास्थळी आक्रोश आणि किंकाळ्या ऐकू येत होत्या. जेसीबीच्या सहाय्याने भिंत फोडून कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. प्राथमिक माहितीनुसार ३७ पैकी १० कामगारांना बाहेर काढण्यात यश मिळाले. मात्र, २० कामगार अडकले होते. सायंकाळी उशिरापर्यंत २० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाने कुलींग सुरू केले आहे. त्यानंतरच आगीतील मृत्यूचा नेमका आकडा समजेल, असे पोलीसांनी सांगितले. आग नेमकी कशामुळे लागली, ते समजू शकले नाही. मात्र, आगीची तीव्रता पाहता आतमध्ये मोठ्या प्रमाणात सॅनिटायजर तसेच इतर ज्वलनशील रसायन साठा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पिरंगुट एमआयडीसीमध्ये अनेक लहान मोठ्या कंपन्या असून येथे हजारो कामगार काम करीत आहेत.

अधिक वाचा  गुढीपाडव्यानिमित्त अयोध्येतील रामलल्लांनी परिधान केले पुणेकरांनी विणलेले वस्त्र

वॉटर प्युरीफायरसाठी लागणारं क्लोराईड नावाचं केमिकल बनवणारी ही कंपनी होती. आगीनंतरही कंपनीत क्लोरीन, क्लोराईडचे बॉक्स दिसत आहेत. केमिकल कंपनी असल्यामुळे आग जास्त धुमसली. जिल्हाधिकाऱ्यांनी आगीत 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. मात्र, कंपनीच्या मालकांनी आगीत 17 जण गमवल्याची तक्रार केली होती. आतापर्यंत 18 जणांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागले आहेत. ते सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. जवान अजूनही रेस्क्यू करत आहेत. पण आगीवर नियंत्रण मिळालं आहे. सध्या कुलिंगचं काम सुरु आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love