पुणे : देशातील सर्वात विश्वासार्ह फर्टिलिटी एक्स्पर्ट्सपैकी एक असलेल्या ओॲसिस फर्टिलिटीतर्फे कृत्रिम प्रजनन तंत्र (आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्स- एआरटी) कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आणि पुण्यात ‘रिप्रोड्यूस’ या अभियानाची अधिकृतपणे सुरूवात करण्यात आली.
ओॲसिस फर्टिलिटीने ज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित या एक्स्लूझिव्ह प्लॅटफॉर्मचे आयोजन केले. हा ज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित असून यात प्रजनन तज्ञ, श्रेष्ठ भ्रूणशास्त्रज्ञ आणि प्रतिष्ठित स्त्रीरोग तज्ञ यांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तींनी भाग घेऊन वैद्यकीय व्यावसायिकांचे प्रबोधन केले.
पुण्यातील ओएसिस फर्टिलिटी हे आपल्या प्रगत तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम तज्ञांच्या टीमसह महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट ठरले असून त्याचा यशाचा दर सातत्याने वरचा राहिला आहे. विविध क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनात कॉन्क्लेव्ह आणि मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. पुनरुत्पादन मोहिमेचा मुख्य उद्देश जोडप्यांना अडथळा दूर करण्यात मदत करण्यासाठी पुनरुत्पादनाच्या गंभीर विषयावर ज्ञान प्रदान करणे आहे. विविध क्षेत्रांतील नामवंत तज्ज्ञांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाने या कॉन्क्लेव्ह आणि मोहिमेची सुरूवात करण्यात आली.
या अभियानाचा एक भाग म्हणून ओअॅसिस आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे पीजीटी, इआरए, मायक्रोटीईएसई इत्यादींसारखे प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध करून देईल. संशोधनातील पाठपुरावा आणि शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी सतत प्रयत्न यांमुळे जोडप्यांना केवळ अधिक चांगले परिणाम मिळविण्यात मदत झाली नाही तर त्यांच्या पालकत्वाच्या प्रवासातही सुधारणा झाली. याबाबत सविस्तर माहिती https://oasisindia.in/reproduce या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या वेबसाईटद्वारे एआरटीच्या क्षेत्रातील तज्ञांना कोणतेही प्रश्न विचारले जाऊ शकतील.
पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी आहे. गेल्या दशकभरात त्यात प्रचंड परिवर्तन घडून आले आहे. अनेक मिलेनियल्स अतिशय वेगाने पुण्यात स्थायिक होत असून येथील ६२ टक्के लोकसंख्या ३० वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. त्यातील सरासरीपेक्षा जास्त लोकांचा वयोगट हा २५ ते ३४ वर्षे हा आहे. लोकसंख्येचे हे स्वरूप पाहता यातील मोठा वयोगट हा प्रजननक्षम वयातील आहे. तरुण जोडप्यांना त्यांच्या प्रजनन आणि वैवाहिक आरोग्याबद्दल जागरुकता असणे आवश्यक आहे.
आज ६ पैकी १ जोडपे हे वंध्यत्वाने ग्रस्त आहे. प्रदूषणात वाढ होत असून शुक्राणू आणि एग काऊंड (अंड्यांची संख्या) कमी होत आहे, प्लास्टिकचा वापर वाढत असून उशीरा विवाह आणि उशिरा बाळंतपण वाढत आहे. त्यामुळे प्रजनन आरोग्याबाबत व्यापक जनजागृती कार्यक्रम आणि प्रजनन आरोग्यासाठी सुविधांची गरज आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन ओअॅसिस फर्टिलिटीने पुण्यात एक अभिनव उपक्रम सुरू केला असून त्याचे नाव आहे ‘रिप्रोड्यूस’. वंध्यत्व ही भारतातील प्रमुख आरोग्य समस्यांपैकी एक बनली आहे. वंध्यत्वाला कसे हाताळायचे, याबाबत लोकांमध्ये भीती, गैरसमज आणि जागरूकतेचा अभाव आहे. समाजाची मानसिकता बदललेली नाही. आपल्या समस्यांबद्दल लोकांना मोकळेपणाने बोलता सांगता येईल असे सुसंवादी वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज आहे.
याप्रसंगी बोलतांना ओअॅसिस फर्टिलिटीच्या सह-संस्थापक आणि वैद्यकीय संचालक डॉ. दुर्गा जी. राव म्हणाल्या, या व्यासपीठाच्या माध्यमातून तंत्रज्ञान, निदान आणि उपचारांच्या बाबतीत आमचे सर्वोत्तम कौशल्य आम्ही वैद्यकीय व्यवसायातील मोठ्या समूहासोबत वाटू इच्छितो. आमचे पुणे केंद्र हे उत्कृष्ट केंद्रांपैकी एक असून त्याचा विशेष भर मायक्रोटीईएसई (MicroTESE) यावर आहे. त्याने अनेक जोडप्यांना पालक बनण्यास मदत केली आहे. कपल्सना अधिक सुरक्षित, अधिक सोयीस्कर आणि सुसंवादी अनुभव मिळावा अशी आमची इच्छा आहे.
यावेळी ओअॅसिस फर्टिलिटी, पुण्याचे क्लिनिकल हेड आणि फर्टिलिटी स्पेशलिस्ट डॉ. नीलेश उन्मेश बलकवडे म्हणाले, या विशेष प्रसंगी ‘रिप्रोड्यूस’ हे अनोखे अभियान सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. वैद्यकीय समुदायात ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचे व्यासपीठ म्हणून ते काम करेल. त्यामुळे जोडप्यांना त्यांचे पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी आपल्या ज्ञानाचे ते पुनरुत्पादन करू शकतील. प्रजननक्षमतेचे ज्ञान वाढविण्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञांना प्रशिक्षित करणे आणि त्यातून रूग्णांमध्ये प्रजनन क्षमता सुधारणे हा त्यामागचा हेतू आहे.
ओअॅसिस फर्टिलिटीचे सायंटिफिक हेड आणि मुख्य भ्रूणशास्त्रज्ञ डॉ. कृष्णा चैतन्य म्हणाले, अशा प्रकारची जागा ही आपल्या सर्वांना एकत्रितपणे काम करून उपचारांचे अनुभव वैयक्तक करण्याची संधी देते आणि रुग्णांमधील फलनिष्पत्ती सुधारण्यासाठी प्रेरणा देते. एक सर्वसमावेशक दृष्टीकोन आणि करुणामय शुश्रुषा हे त्यांचे जीवन अधिक चांगले बनविण्यात मदत करतात.