पुणे -इमारत बांधणी क्षेत्रातल्या आघाडीच्या अपर्णा एन्टरप्राईझेस लिमिटेड कंपनीने पुढील चार वर्षांत अॅल्युमिनियम खिडक्या आणि दरवाजे यंत्रणा अल्तेझा ब्रँडची उभारणी करण्यासाठी १०० कोटींची गुंतवणूक करण्याची योजना असल्याचे आज जाहीर केले. या गुंतवणुकीचा उपयोग उत्पादन पोर्टफोलिओला आणि त्याचबरोबर उत्पादन सुविधेला, विपणन आणि रिटेलिंगला बळकटी आणण्यासाठी करण्यात येईल.
यावेळी त्यांनी अगदी अलिकडे तयार केलेली स्लिम अॅल्युमिनियम स्लायडिंग डोअर यंत्रणा- एसीए एम-१९ सिरीज पण सादर केली. ही यंत्रणा अगदी अरुंद साईटलाईन्स मध्येही कार्यरत राहणार असून अल्तेझातर्फे आपल्या ग्राहकांसाठी सादर करण्यात आलेली ही सर्वाधिक बारीक अॅल्युमिनियम स्लायडिंग डोअर यंत्रणा आहे. ही आगळीवेगळी यंत्रणा मिनीमॅलिस्टीक (किमान चौकट प्रबंधक) रचनेवर आधारित असून त्यामध्ये १९ मिलीमीटरचा पातळ अॅल्युमिनियम प्रोफाईल इंटरलॉक सकट संपूर्ण दरवाजाभर असेल. ही यंत्रणा कॉर्नर ओपनिंग्जनाही (कोपऱ्यात उघडणाऱ्या) लागू होऊ शकणार आहे.
अल्तेझा बद्दलच्या योजनांबद्दल बोलताना अपर्णा एन्टरप्राईझेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री.अश्विन रेड्डी म्हणाले, भारतातली अॅल्युमिनियम खिडक्या आणि दरवाजे यंत्रणा बाजारपेठ २०००० कोटी रुपयांना बंद होऊन ७.९% दराने वाढत आहे. चांगल्या गुणवत्तेची उत्पादने आणि सेवा यांना मागणी मोठी आहे आणि आम्ही ही मागणी पूर्ण करण्यासाठी तयार आहोत. १०० कोटींपैकी ६० टक्के निधी हा उत्पादन प्रक्रियेला बळकटी आणण्यासाठी वापरण्यात येईल. उर्वरित निधी संशोधन आणि विकास कार्य तसेच आमच्या डीलरशीपचे जाळे मजबूत करण्यासाठी वापरला जाईल. या विकासाकडे नजर ठेऊन आम्ही आमची टीम मजबूत करण्याची योजनाही आखत आहोत. २०२१ च्या अखेरीपर्यंत १०० हून अधिक लोकांची नेमणूक आम्ही करणार असून त्यातले बहुतांश जण तेलंगणा मधील असतील. २०२५ पर्यंत अल्तेझा संघटीत अॅल्युमिनियम खिडक्या आणि दरवाजे बाजारपेठेत ८-१०% प्रभुत्व मिळवेल अशी आम्हांला आशा आहे.
२०१९ मध्ये सादर करण्यात आलेल्या अल्तेझाकडे अॅल्युमिनियम खिडक्या, दरवाजे आणि रेलिंग यंत्रणेची मोठी रेंज आहे. अल्तेझा एसीए एम-१९च्या साथीने ब्रँड वेगाने वाढणाऱ्या प्रीमियम अॅल्युमिनियम खिडक्या आणि दरवाजे बाजारपेठेत भक्कम पाय रोवणार आहे. एसीए एम-१९ ही नवीन यंत्रणा अपर्णा एन्टरप्राईझेसची सर्वाधिक स्लिम स्लायडिंग डोअर यंत्रणा आहे. नेहमीच्या स्लायडिंग डोअर यंत्रणेत असणाऱ्या ४० मिलीमीटरच्या तुलनेत इंटरलॉक आणि रिव्हर्स इंटरलॉक यांच्यासह ही यंत्रणा केवळ १९ मिलीमीटरची असणार आहे. एसीए एम-१९ यंत्रणा 6.72 M2 डायमेंशनचा एक पॅनेल सांभाळू शकणार असून ३०० किलो वजनाचा एक पॅनेल सांभाळू शकणार आहे.