सात्विक आहार, आचार व विचारांच्या परंपरेतून नैतीक मुल्याधारीत, संवेदनशील समाज निर्माण व्हावा : ज्येष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस

अन्नब्रम्ह पुरस्कार
अन्नब्रम्ह पुरस्कार

पुणे : अन्न हे पूर्णब्रह्म असून अन्न तयार करणाऱ्याच्या कामाचा व ते सामाजिक दृष्टीकोनाची जोड देऊन विक्री व्यवसायाच्या कष्टाचा सन्मान होतोय ही आनंदाची बाब आहे. संविधानाला जात धर्म नसतो, तसा अन्नालाही जात धर्म नसतो. अन्नदानाची सात्विक भावना ही मानवतेची आहे. समाजीक बेबनाव, क्रुरता व असुरक्षा रोखण्या करीता सात्विक आहार, आचार व विचारांच्या परंपरेतून ‘नैतीक मुल्याधारीत, संवेदनशील समाज निर्माण होणे ही काळाची गरज आहे. असे मत अ भा साहीत्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

बल्लवाचार्य कै. म. वा. जोशी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा यंदाचा (२०२४-२५) चा चौथा “अन्नब्रम्ह” पुरस्कार, पुणे शहरातील नामांकित ‘श्री मुरलीधर व्हेज’ अर्थात पूर्वाश्रमीचे मुरलीधर भोजनालयाचे संचालक श्री व सौ शारदा गोपाळदादा तिवारी कुटुंबीय यांना प्रदान करण्यात आला. अन्नब्रम्ह पुरस्कार मानपत्र, सन्मान चिन्ह व रु ५०००/- असे स्वरुप होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस हे बोलत होते.  सौ. विमलाबाई गरवारे हायस्कूल येथे सावित्रीबाई फुले पुणे वि‌द्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांचे हस्ते या पुरस्कारचे वितरण करण्यात आले.यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हासदादा पवार,  पुरस्काराचे संयोजक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, प्रसाद जोशी उपस्थित होते.

अधिक वाचा  एसटी बसमध्ये झोपण्यास जागा देऊन चालकाचा महिलेवर बलात्कार

डॉ. पराग काळकर म्हणाले, अलीकडच्या तरुण पिढीला अन्न किंवा अन्नदान ही संकल्पनाच कळलेली नाही. ‘टू मिनिट नूडल्स’च्या जमान्यात त्यांना अन्न तयार करण्यामागचे कष्ट कळत नाही. पुण्याच्या विकासात जसे उद्योग क्षेत्राचे महत्त्व आहे तसे शिक्षण क्षेत्राचे पण आहे. पुण्यात दरवर्षी 4 लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्यातील बहुतांशी विद्यार्थी नोकरी निमित्त पुण्यातच राहतात. या काळात भोजनालयाचा खूप मोठा आधार त्यांना असतो.

उल्हासदादा पवार म्हणाले, पिझा – बर्गर सारख्या पाश्चात्य फास्ट फूड खाद्य संस्कृतीच्या वावटळीत, भारतीय खाद्य संस्कृती जपण्याचे काम मुरलीधर भोजनालय व तिवारी कुचुंबिय करत आले आहे जे निरोगी प्रकृती करीता आवश्यक आहे त्यामुळे परदेशी लोकांना पण या खाद्य संस्कृतीने भुरळ घातली आहे. मात्र ज्या प्रमाणे उडपी आपल्या देशाच्या प्रत्येक भागात व्यवसाय करताना दिसतात, तसा मराठी माणूस खाद्य व्यवसाय करताना दिसत नाही अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा  एमआयटी 'एडीटी’त ‘आषाढ़ का एक दिन’ चा प्रयोग

पुरस्काराला उत्तर देताना गोपाळदादा तिवारी म्हणाले, पुर्वाश्रमीच्या मुरलीघर भोजनालयाची ओळख जपण्यासाठी ‘विद्यार्थी मेस’ची संकल्पना मर्यादित संख्येत आज ही राबवीत आहोत. सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेने व्यवसायात नैतिक मुल्यांचे अधिष्ठान ठेवणे गरजेचे असून, ‘नफ्या बरोबर ग्राहकांचा संतोष व समाघान’ कमावणे हे मुरलीघर’ चे प्रथम पासुन वडीलोपार्जित ऊद्दीष्ट ठरले आहे. राज्याच्या विविघ भागातुन अनेक महत्वाचे कलाकार, राजकीय व्यक्ती, उद्येग व्यवसाईक, उच्च पदस्थ यांनी मुरलीघर भोजनालयातील जेवणाचा आस्वाद घेतला आहे. हा पुरस्कार तीन पिढ्यांच्या तपस्येचा, ऊत्तरदायीत्वाच्या सातत्याचा सन्मान आहे. ते म्हणाले, या पुरस्काराचे दुसरे वैशीष्ठ्ये म्हणजे डॉ जोशी सरांनी वडीलांच्या कष्टप्रद आयुष्याचे स्मरण जपत इतर ‘अन्न – व्यवसाईकांना’ सामाजिक जाणीवेची प्रेरणा देण्याचा हेतू साधला आहे. कामगार वर्गा’ प्रती आजवर जपलेला कौटुंबिक व मानवी दृष्टीकोन व त्याची कृतीशील दखल इ मुळे हे शक्य झाल्याचे ही गोपाळदादा तिवारी यांनी यावेळी सांगीतले. तसेच ‘परगांवच्या गरीब, गरजू विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांच्या मुलांना, दुष्काळजन्य परिस्थितीत व कोरोना काळात सेवा देण्याऱ्या घटकांना’ मुरलीघर भोजनालयातुन, व्यवसाईक दृष्टीकोना पेक्षा सामाजिक दृष्टीकोनातुन’ सेवा दिली गेली याचा अभिमान वाटतो..!

अधिक वाचा  भल्या पहाटे अजित दादांनी केली मेट्रोच्या कामाची पाहणी

डॉ. न. म. जोशी आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले, माझे वडील हे आचारी काम करायचे म्हणून त्यांच्या स्मृतीदिनी श्राद्ध घालण्यापेक्षा अन्न क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सन्मान करण्याचं आम्ही ठरवलं. हीच खरी त्यांना आदरांजली आहे असे मला वाटते. मुरलीधर भोजनालायाची कीर्ती पूर्वी पासून आम्ही ऐकत आलोय.  मुरलीधर च्या भोजनाची वाजवी किंमतीतील सुग्रास चव चोखंदळ पुणेकरांच्या पसंतीची आहे.गोपाळदादा तिवारी हे सामाजिक जाणीव असलेले राजकारणी असल्याचे डॅा न म जोशी सरांनी सांगितले.

पुरस्काराची रक्कम गरीब व गरजू विद्यार्थ्यांना

तिवारी कुटुंबीयांनी पुरस्काराची मिळालेले रु ५०००/- हे गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहाय्या करीता डॅा. न. म. जोशी सरांकडे सुपुर्त केले..  मानपत्राचे वाचन दीप्ती डोळे यांनी केले. प्रसाद जोशी यांनी सुत्र संचालन व आभार प्रदर्शन केले. अमर काळे यांच्या ‘गायन कार्यक्रमा’सह मुरलीधर च्या ‘स्नेह भोजना’ने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love