Maharashtra Olympic Association Election: महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या (Maharashtra Olympic Association – MOA) अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यात सुरू असलेली रस्सीखेत अखेर संपुष्टात आली आहे. महायुतीमध्ये कोणताही नवा वाद निर्माण होऊ नये यासाठी शुक्रवारी रात्री उशिरा या संदर्भात मोठी घडामोड घडली आणि उच्च पदस्थांच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये समझोता (Settlement) झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या समझोत्यानुसार, अजित पवार (Ajit Pawar) हे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष असणार आहेत. तर मुरलीधर मोहोळ (Murli Dhar Mohol ) निवडणुकीतून माघार घेणार असल्याचे समजते आहे. या समझोत्याला मूर्त स्वरूप देण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा हस्तक्षेप आणि त्यांनी काढलेला तोडगा महत्त्वाचा ठरला आहे. तसेच, प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची दिल्लीतील शिष्टाई देखील फळाला आल्याचे सांगितले जात आहे.
अध्यक्षपदाची सूत्रे आणि कार्यकाळ:
निवडणुकीपूर्वीच झालेल्या या महत्त्वपूर्ण समझोत्यानुसार, अध्यक्षपद अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे निश्चित झाले आहे. तर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्याकडे वरिष्ठ उपाध्यक्ष पद त्याचबरोबर खजिनदार (Treasurer) आणि सचिव (Secretary) पद असणार आहे.
सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, अध्यक्षपदाच्या एकूण कार्यकाळात अर्धा कार्यकाळ दोघांना मिळणार आहे. म्हणजेच, अजित पवार (Ajit Pawar) आणि मुरलीधर मोहोळ मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol } यांना प्रत्येकी दोन वर्ष अध्यक्ष पद मिळणार आहे.
पदांच्या वाटपाव्यतिरिक्त, संघटनेतील एकूण जागांवरही सेटलमेंट झाली आहे. सूत्रांनुसार, 11 जागा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ ( Murlidhar Mohol )यांच्याकडे तर 10 जागा अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे जाणार आहेत.
या निवडणुकीसाठी 2 नोव्हेंबर रोजी मतदान होणार होते. भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (Ajit Pawar NCP) हे दोन्ही पक्ष सत्तेत (महायुतीत) असल्यामुळे, त्यांनी एकमेकांविरोधात न लढण्याचा निर्णय घेतला. या समझोत्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. तथापि, मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol यांनी अधिकृतरीत्या माघार घेतली की नाही हे उद्या (रविवार दिनांक २ नोव्हेंबर) स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले आहे.
भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे आरोप:
या निवडणुकीच्या वादाला भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपाची पार्श्वभूमी होती. मुरलीधर मोहोळ (Murli Dhar Mohol) यांनी निवडणुकीत उडी घेताना ऑलिम्पिक संघटनेच्या सचिवांवरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यांनी स्पष्ट केले होते की, जर अजित पवार (Ajit Pawar) यांनी सचिवांमार्फत होत असलेल्या गैरव्यवहारांवर लक्ष घातले, तर आपल्याला ही निवडणूक लढायची नाही.
यापूर्वी, अजितपवार हे जवळजवळ 15 वर्षे म्हणजेच तीन टर्म महाराष्ट्र ऑलिम्पिकचे अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात तत्कालीन जनरल सेक्रेटरी नामदेव नामदेव शिरगावकर (Nmadeo Shirgaonkar)यांनी पैशाचा हिशोब दाखवला नाही आणि खेळाडूंसाठी मिळणाऱ्या निधीचा (प्रत्येक नॅशनलला 4-4 कोटी रुपये) हिशोब दिला नाही, असा आरोप मोहोळ गटाने केला होता. खेळाडूंना कमी दर्जाचे ट्रॅकसूट जास्त पैशात विकत आणून मोठा भ्रष्टाचार करण्यात आला होता, असेही आरोप करण्यात आले होते.
दरम्यान, (Ramdas Tadas) – भाजप नेते आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष – यांनी Ajit Pawar यांच्यावर आरोप करत त्यांनी या निवडणुकीतून माघार घ्यावी आणि क्रीडा संघटनांवर केवळ माजी खेळाडू म्हणून राहावे, अशी मागणी केली होती.
अजित पवारांची क्रीडा क्षेत्रातील पार्श्वभूमी:
Ajit Pawar हे यापूर्वी तीन वेळा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेकडून (Kho-Kho Association of Maharashtra) अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला होता.
2006 ते 2018 दरम्यान त्यांनी महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेचे अध्यक्षपद भूषवले होते. सात वर्षांच्या Cooling-off Period नंतर ते 2025 मध्ये पुन्हा अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत.
या निवडणुकीत जर माघार झाली नसती, तर 60 मतदारांवर या सगळ्या नेत्यांचे भवितव्य अवलंबून असते. मात्र, आता महायुतीच्या नेत्यांनी एकत्र येऊन सत्तेत असलेल्या दोन पक्षांमधील संघर्ष टाळत समझोता घडवून आणला आहे.













