एअर मार्शल (निवृत्त) प्रदीप बापट मध्यप्रदेश रत्न अलंकार पुरस्काराने सन्मानित


पुणे – कर्वेनगर मधील एअर मार्शल ( निवृत्त ) प्रदीप पद्माकर बापट यांना मध्यप्रदेश प्रेस क्लबच्या वतीने  भोपाळ येथे या वर्षीच्या शौर्य व पराक्रम क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार मध्यप्रदेश रत्न अलंकार पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भोपाळ येथील कुशाभाऊ ठाकरे आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन केंद्रात सोमवार दिनांक २५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता एका शानदार कार्यक्रमात मध्य प्रदेशचे राज्यपाल माननीय मंगुभाई पटेल यांचे हस्ते शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन एअर मार्शल (निवृत्त) प्रदीप पद्माकर बापट,(परम विशिष्ट सेवा मेडल) यांनी मातृभूमिसाठी दिलेल्या समर्पित सेवेबद्दल मध्य प्रदेश रत्न- अलंकार पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी ओंकारेश्वर धाम जुन्या आखाडाचे महामंडलेश्वर श्री १००८ धर्मेंद्र पुरी महाराज यांची मुख्य उपस्थिती होती.

अधिक वाचा  इंद्रायनी नदी पुन्हा फेसाळली

या प्रसंगी भोपाळ येथील मध्य प्रदेश प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष डॉ नवीन आनंद जोशी, महासचिव नितीन वर्मा,व प्रेस क्लब चे पदाधिकारी,वरिष्ठ शासकीय अधिकारी,प्रतिष्ठित नागरिक,पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.

साहित्य,कला,संस्कृती,सेना,उद्योग समाजसेवा या क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींना मध्य प्रदेश रत्न अलंकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.या वर्षीच्या पुरस्कार मानकरी मध्ये एअर मार्शल ( निवृत्त )प्रदीप बापट व्यतिरिक्त साहित्य व कला मधील डॉ लक्ष्मी शर्मा, पत्रकार पदमश्री अलोक मेहता,चित्रपट अभिनेता रुमी जाफरी,उद्योजक संजीव सरन,शॉर्ट फिल्म निर्माता देवेंद्र खंडेलवाल,कवी डॉ सुधीर सक्सेना,रंगकर्मी लोकेंद्र त्रिवेदी,कथक नृत्यांगना टिना देवळे-तांबे,जनजाती मुलांच्यासाठी कार्य करणारे समाजसेवक निर्मलदास नारंग, यांचा समावेश होता.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love