कसब्यात परिवर्तनाची सुप्त लाट : रविंद्र धंगेकर

पुणे-मुंबई राजकारण
Spread the love

पुणे(प्रतिनिधि)–कसबा विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाची सुप्त लाट दिसून येत असून या मतदार संघातील प्रश्नांकडे भाजपाने सातत्याने दुर्लक्ष केल्याने आता नव्या विचारांच्या व काम करणार्‍या उमेदवारास मतदान करायची भावना नागरिकांना भेटल्यावर  त्यांच्या बोलण्यात दिसून येत आहे, अशा भावना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व अन्य मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदार रविंद्र धंगेकर यांनी व्यक्त केल्या. आज सकाळी झालेल्या पदयात्रेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

आजची पदयात्रा अखिल मंडई मंडळाच्या गणपतीपासून सुरु झाली. यामध्ये उमेदवार रविंद्र धंगेकर यांचे अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी धंगेकर यांनी मंडई  गणपतीची आरती करुन आर्शीवाद घेतले. येथून मोठ्या जल्लोषात पदयात्रेला सुरुवात झाली. यामध्ये रविंद्र धंगेकर यांच्या सोबत उल्हासदादा पवार, अण्णा थोरात, संजय बालगुडे, कमलताई व्यवहारे, निता परदेशी, बाळासाहेब मारणे, बाळासाहेब आमराळे, सुनिल खाटपे, गणेश नलावडे, वनराज आंदेकर, बंडू शेडगे, भोला वांजळे, संदीप गायकवाड, रुपेश पवार, संतोष भुतकर,  युवराज पारिख, हर्षद ठकार, मंकरद माणकीकर, चंदन सुरतवाला, शुभम दुगाने, नागेश खडके, हर्षद ठकार, अश्विनी म्हलारे, बबलू कोळी, सुरेश कांबळे,  वनराज आंदेकर, प्रितम तुंगतकर, पुरुषोत्तम नांगरे, संतोष जोशी, नरेश नलावडे, ॠषिकेश विरकर, अप्पा पंडित, अनिल येनपुरे, अनिकेत थोरात, योगेश इंगुळकर, रुपेश पवार, अरविंद दाभोळकर, नितीन ऐलारणूकर, गोरख पळसकर, अक्षय माने आदि नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पदयात्रेत तिन्ही पक्षांचे झेंडे डौलाने फडकत होते. हजारो कार्यकर्ते, नागरिक पदयात्रेत सहभागी झाले होते. झिंदाबादच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. राजकीयदृष्ट्या जागृत असणार्‍या या भागात अनेक गणेश मंडळांनी धंगेकरांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले. या सर्व मंडळांच्या श्रींची आरती रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच शाल व श्रीफळ देऊन सत्कारही करण्यात आला.

पदयात्रेच्या मार्गावर अनेक ठिकाणी सुवासिनींनी धंगेकरांचे औक्षण केले. अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना वाकून नमस्कार करुन त्यांनी आर्शीवाद घेतले. तसेच मार्गावरील अनेक सोसायट्यांमध्ये ‘घरी या’ असा आग्रह नागरिक करीत होते. तुळशीबाग परिसरात कापड व अन्य दुकानदारांनी धंगेकर यांचा जागोजागी सत्कार केला. बुरुड आळीमध्ये टोपल्या व बांबूच्या वस्तू करणार्‍या कारागिरांची भेट घेतली. तुळशीबाग परिसर व बुरुड आळी परिसरात अनेकांनी आपले प्रश्न मांडले आणि वारंवार मागण्या करुनही भाजपाने काही केले नाही, आता तुमच्याकडून अपेक्षा आहे, अशा भावना व्यक्त केल्या.  मंडई परिसरातील महावितरणच्या उपकेंद्रातील कर्मचार्‍यांनी बाहेर येऊन सत्कार केला.

क्रवारपेठेत श्री यल्लमा देवदासी संस्थेत जाऊन त्यांचे दीर्घकाळ न सुटलेले प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. तेव्हा सर्व भगिंनीनी टाळ्यांचा कडकडाट केला. सुमारे चार तास चाललेल्या पदयात्रेचा समारोप दुपारी दोन वाजता चिंचेची तालीम येथे झाला. पदयात्रेला मिळालेल्या फार मोठ्या प्रतिसादामुळे तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला होता.

आज सकाळच्या पदयात्रेचा मार्ग मंडई गणपती-टिळक पुतळा बाबु गेनू मंडळ-तुळशीबाग गुरुजी तालीम- जोगेश्वरी- फरासखाना-भाऊ रंगारी गणपती-सकाळ प्रेस- पुना बेकरी करळेवाडी- जोगेश्वरी-जिलब्या गणपती-भाऊ महाराज बोळ- रतन सायकल मार्ट- वूरुड आळी- राजीव गांधी पथ संस्था- लंकेवाडा- शिंदे आळी- बदामी हौद- प्रेमाचा चहा-जुना जाईचा गणपती-काळा हौद-दुध्या मारुती- अकरा मारुती कोपरा-अभिषेक हॉटेल- आंग्रे वाडा-सेवा मित्र मंडळ- आंबा माता मंदिर- मामलेदार कचेरी शिवाजी मराठा-व्हाईट हाऊस-प्रमोद महाजन संकुल सेंटर- महादेव मंदिर-शाहु पुरा-बनराज मंडळ- गजराज मंडळ- साठे कॉलनी- हिराबाग- सुभाषनगर-चिंचेची तालीम असा होता.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *