चारित्र्याच्या संशयावरून महिला आणि तिच्या दोन मुलांचा खून करून त्यांचे मृतदेह जाळले


पुणे- चुलत दिराबरोबर पळून येऊन त्याच्यासोबत राहणाऱ्या महिलेचा आणि तिच्या दोन मुलांचा चारित्र्याच्या संशयावरून चुलत दिरानेच खून करून तिघांचे मृतदेह जीवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील कोंढवा भागात उघडकीस आला आहे.

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी वैभव रुपसेन वाघमारे (वय ३०, रा. पिसोळी, मुळ रा. लोहोटा, ता. औसा, जि. लातूर) याला अटक केली आहे. आम्रपाली वाघमारे (वय २५), रोशनी (वय ६), आदित्य (वय ४) अशी खून केलेल्या तिघांची नावे आहेत. ही घटना पिसोळी येथील शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. समीर साहेबराव मासाळ (वय ३४, रा. पिसोळी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  समीर मासाळ यांच्या पिसोळीत असलेल्या शेतीमध्ये देखरेखीसाठी वैभव वाघमारे हा  शेतातच पत्र्याच्या शेडमध्ये राहात आहे. वैभव हा आम्रपलीचा चुलत दीर आहे. आम्रपली विवाहित असून तिला रोशनी आणि आदित्य हे दोन आपत्य आहेत. आम्रपालीचे चुलत दीर असलेल्या आरोपी वैभवशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे ते दोघे वर्षापूर्वी पळून आले होते. ते पिसोळी येथे मासाळ यांच्या शेतात देखरेखीचे काम करत आणि शेतातच पत्र्याच्या शेडमध्ये राहात होते.

अधिक वाचा  #'हीट अँड रन' प्रकरण : अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द : ५ जूनपर्यंत बाल सुधार गृहात रवानगी

आम्रपलीचे दुसऱ्या पुरुषाबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय वैभवला होता. त्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला होता. त्याच्या रंगातून वैभवने त्याच्याबरोबर असलेल्या आम्रपाली व तिच्या दोन मुलांचा गळा दाबून खून केला त्यानंतर या तिघांना पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन घरातील कपडे, बेडशीट आणि लाकडे वापरुन त्या तिघांचे मृतदेह जाळले. हा प्रकार बुधवारी रात्री घडला.

शेतात आग लागल्याचे दिसल्याने नागरिकांनी पोलिसांना याबाबत कळविले. पोलिस आणि अनग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तात्काळ दखल झाले. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love