संविधानाचे रक्षण केले तर संविधान आपले रक्षण करील : ॲड. सदानंद फडके


पुणे- “धर्मो रक्षति रक्षितः” असे म्हणण्याची आपल्याकडे परंपरा आहे. याचा अर्थ तुम्ही धर्माचे रक्षण करा म्हणजे धर्म तुमचे रक्षण करील, असा होतो. या वाक्यातील धर्म शब्द काढून संविधान टाकला की “संविधानाचे रक्षण करा म्हणजे संविधान तुमचं रक्षण करील,” असा अर्थ होतो. त्यामुळे संविधानाचे रक्षण हे सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन अॅड. सदानंद फडके यांनी गुरुवारी केले.

स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने सिंहगड रस्ता भागातील सनसिटी भागात आयोजित स्वा. सावरकर स्मृती व्याख्यानमालेत “भारतीय संविधानाची राष्ट्रजीवनातील भूमिका”या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळे ज्येष्ठ मूर्तिशास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर काळकर, सचिव रवींद्र शिंगणापुरकर, व्याख्यानमाला प्रमुख राघवेंद्र देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वांसाठी खुली असलेल्या या व्याख्यानमालेचे उद्घाटन डॉ. देगलूरकर यांच्या हस्ते झाले आणि ती २९ जानेवारीपर्यंत चालणार आहे.

अधिक वाचा  काळानुरूप कलाकारालाही बदलावेच लागते – कौशिकी चक्रबर्ती

यावेळी अॅड. फडके म्हणाले, की भारत सरकार कायदा २६ नोव्हेंबर १९३५ रोजी मंत्रिमंडळात परित करण्यात आला आणि १९३७ झाली अमलात आणण्यात आला. यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताचे संविधान लागू झाल्यानंतर भारताचा प्रत्येक नागरिक स्वामी झाला. संविधानाचे रक्षण केले तर  संविधान आपले रक्षण करेल. मात्र यासाठी  सर्व प्रणाली व्यवस्थित चालायल्या हव्यात. देशात १९७५ आणीबाणी जाहीर करण्यात आली. त्यावेळी मूलभूत अधिकारांची पायमल्ली झाली. त्याचवेळेस देशातील १४ उच्च न्यायालयांनी सांगितले की मूलभूत अधिकार हिरावून घेता येणार नाहीत. न्या. रे, न्या. बेग, न्या. चंद्रचूड आणि न्या. भगवती यांनी मूलभूत अधिकाराच्या  विरोधात निर्णय दिला होता मात्र न्या. एच. आर. खन्ना यांनी त्यांचे विरोधात निर्णय दिला. रा. स्व. संघाचे तत्कालीन सरसंघचालक स्व. बाळासाहेब देवरस यांनीही सांगितले होते, की मूलभूत अधिकारांमध्ये काही तरतुदी करणे गरजेचे आहे. 

अधिक वाचा  सर्वसामान्यांना शिक्षण मिळू नये अशा पद्धतीचे सत्ताधाऱ्यांचे धोरण- शरद पवार

डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रत्यक्ष भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच या व्याख्यानमालेतून होईल स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जाज्वल्य कार्याची माहिती लोकांना होईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली. ते म्हणाले, की स्वा. सावरकरांनी देशाची अनेक प्रकारे सेवा केली. क्रांतिकारक म्हणून कार्य करतानाच अनेक शब्द मराठीत आणले. ते खऱ्या अर्थाने भारत मातेचे पुत्र होत.

प्रास्ताविक करताना अध्यक्ष सुधीर काळकर म्हणाले की स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान ही संस्था 2010 मध्ये व्याख्यानमालेच्या माध्यमातून सुरू झाली. आज एकूण 45 वस्त्यांमध्ये संस्थेचे काम सुरू आहे. उपक्रमांच्या माध्यमातून 31 समृध्दी वर्ग चालवले जात असून या वर्गांवर विशेष प्रशिक्षण देवून शिक्षकांची नेमणूक केली आहे. यांमध्ये 39 शिक्षिका आणि 1260 विद्यार्थी आहेत. दिवाळी उपक्रम, क्रिएटिव्ह ॲक्टिविटी,मातीच्या वस्तू बनविणे, नित्य स्तोत्र पठण करणे, तिळगूळ व पतंग बनविणे, वाहतूक नियंत्रण यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून समृध्दी वर्ग सुरू आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love