भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना मातृशोक


पुणे -भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.  चंद्रकांतदादा पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील यांचे कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली व त्यांचा परिवार आहे.

पार्थिव देहावर आज दि. २४ जुलै रोजी रात्री ८.३० वा कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या आईंनी सर्व मुलांवर स्वाभिमानाने आणि मेहनतीने जगण्याचे संस्कार केले. या संस्कारांच्या शिदोरीवर मा. पाटील आणि त्यांचे सर्व‌ कुटुंब आयुष्यभर वाटचाल करत आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  स्वराज्य संघटना २०२४ च्या निवडणुक मैदानात उतरणार : पहिल्या अधिवेशनात छत्रपती संभाजीराजे यांची घोषणा