पुणे-एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) उपक्रमा अंतर्गत ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे म्हणून मोतीबिंदूची शस्त्रक्रिया लांबलेल्या किंवा ती शस्रक्रियाच न केलेल्या करीन रोशनी उपक्रमांतर्गत दिलासा मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे .
या उपक्रमाअंतर्गत देशातील ८७०० रुग्णांच्या मोतीबिंदूंवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत . पुण्यातील एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय, दिल्ली येथील डॉ श्रॉफ्स चॅरिटी आय हॉस्पिटल, नोएडा येथील आयकेअर आय हॉस्पिटल, कोईम्बतूर येथील शंकरा नेत्र फाउंडेशन,आणि गुवाहाटी येथील श्री शंकरदेव नेत्रालय येथे उपचार देण्यात येणार आहेत.
समाजाची सेवा करण्याच्या उद्देशातून एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या भारतातील २५ व्या वर्धापनदिनानिमित्त करीन रोशनी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत एलजीने ५ धर्मादाय रुग्णालयांद्वारे देशातील ८७०० मोतीबिंदू शस्त्रक्रियांना पाठबळ देण्याची घोषणा केली आहे. समाजातील वंचित घटकांना आधार देण्याच्या उद्देशाने या नवीन सीएसआर उपक्रम जाहीर करण्यात आला आहे.लोकांचे जीवन समृद्ध करण्यावर एलजी इलेक्ट्रॉनिक्सने नेहमीच विश्वास ठेवला आहे. या उपक्रमाद्वारे, वंचित दृष्टिहीन लोकांना त्यांची दृष्टी परत मिळवून देण्यास मदत करण्यासाठी कंपनीने आपला पाठिंबा देण्याची तयारी दाखवली आहे. एलजी इलेक्ट्रॉनिक्सने २०१८ पासून हा कार्यक्रम सुरू केला आहे.
एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक यंगलक किम म्हणाले की केवळ अर्थपूर्ण नवकल्पना करणे नाही हे आमचे उद्दिष्ट नाही. त्यामाध्यमातून आमच्या ग्राहकांसाठी सुविधा निर्माण होत असतात. त्यासह नागरिकांचे जीवनमान उंचाविण्याठीचे काम आम्ही गेल्या २५ वर्षांमध्ये केले आहे. ज्या रुग्णांना डोळ्यांबाबत दर्जेदार उपचार घेणे परवडत नाही त्यांच्यासाठी आमचा करीन रोशनी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. ८७०० जणांना नवी दृष्टी भेट देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या उपक्रमासाठी आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही आमच्या सर्व भागीदार रुग्णालयांचे आणि या उपक्रमाशी संबंधित सर्वांचे आभारी आहोत.
एचव्ही देसाई हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक आणि पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशनचे युनिटचे परवेझ बिलिमोरिया म्हणाले की मोतीबिंदू हा देशात अंधत्वाचे प्रमुख कारण आहे. मात्र हे अंधत्व टाळता येण्याजोगे आहे. देशात २२ दशलक्ष अंध (१२ दशलक्ष अंध लोक) आहेत. त्यापैकी ८०.१ टक्के नागरिक हे मोतीबिंदूमुळे अंध आहेत. मोतीबिंदू अंधत्व असलेल्यांची संख्या दरवर्षी सुमारे ३. ८ दशलक्ष आहे. शस्त्रक्रिया परवडत नसलेल्या असंख्य लोकांची दृष्टी वाचवण्यासाठी हा उपक्रम हातभार लावेल. एलजी इआयएलद्वारे त्यांच्या सीएसआर कार्यक्रमांतर्गत ७०० मोतीबिंदू शस्त्रक्रियांना मदत केली जाईल. “ एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिडेटने या उपक्रमाला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. या भागीदारीमुळे, आम्ही अनेक अनोळखी लोकांपर्यंत पोहोचू. त्यामाध्यमातून प्रत्येकासाठी दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध होईल , याची आम्हाला आशा आहे.