राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या कृतीबद्दल भाजपने राज्यातील जनतेची माफी मागावी – गोपाळदादा तिवारी

‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा

पुणे–राज्याच्या संवैधानिक कृती व परंपरांची सतत अवहेलना करीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या  कर्तव्यांपासून पलायन करीत, सतत राजकीय हेतूने प्रेरीत भूमिका घेत आहेत असा करत राज्याच्या मंत्री मंडळाच्या शिफारशींची पुर्ती न करता विविध समाज-घटकांच्या प्रतिनिधींना तब्बल दीड वर्षे ‘संवैधानिक हक्कांपासून वंचित ठेवत “विधान परीषद नियुक्तीच्या” १/६ जागा ही न भरणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या कृतीबद्दल भाजपने राज्यातील जनतेची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली आहे.

‘राज्याच्या मंत्री मंडळाने’, विधान परीषदेच्या संवैधानिक तरतूदी प्रमाणेच १६% विविध क्षेत्रातील प्रतीनिधींच्या नियुक्तीची एकमताने शिफारस करून देखील त्या न भरणे, मंत्रीमंडळाच्या सुचनांचा ऊपमर्द करणे, प्रशासकीय कामकाजात अनावश्यक हस्तक्षेप करणे, ‘ठराविक सिलेब्रीटीज व नेत्यांशीच’ हितगुज साधणे मात्र लोकशाही मार्गाने येणाऱ्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाचे निवेदन ही न स्वीकारणे, असंवैधानिक व घटना विरोधी वक्तव्ये करणे इ. मुळे राजकीय हेतूने प्रेरीत काम करणारे राज्यपालकोश्यारी हे ‘राज्यपाल_कार्यालयीन’ कर्तव्ये पार पाडण्यात अपयशी ठरत असून, घटनेची पायमल्ली करत आहेत असा आरोप तिवारी यांनी केला आहे.

अधिक वाचा  केंद्रीय मंत्रिमंडळाने कडवी डावी विचारसरणी असलेल्या क्षेत्रातील महत्वाच्या सुरक्षा स्थळांच्या 2जी मोबाईल साइट्चे ४ जी मध्ये अद्यवतीकरण करायला दिली मंजुरी

ऊच्च न्यायालयाने सुचक निदर्शक वक्तव्ये करून ही त्यांची कार्यप्रणाली सुधारत  नाही.  या प्रकारांमुळे मुळे महाराष्ट्राची बदनामी होत असून, ‘मविआ सरकार’ला लोकाभिमूख काम करण्यात, विविध समाज घटकांचे हिताचे निर्णय घेण्यात, कायदे इ. बनवण्यात बाधा निर्माण होत आहे’. या सर्व संकटांना राज्यपाल कोश्यारी जबाबदार आहेत.  राज्यपालांची नियुक्ती ही पंतप्रधान व केंद्रीय मंत्रीमंडळाचे शिफारसीवरूनच राष्ट्रपती करतात. त्यामुळे राज्यपाल भाजप नेतृत्वाच्या सल्ल्यावरूनच असे वागतात, हेच अधोरेखीत होते. त्यामुळे भाजपने राज्यातील जनतेची माफी मागावी अशी मागणी गोपाळ तिवारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात केली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love