स्वावलंबन फाउंडेशन आयोजित ‘अष्टभुजा स्त्री सन्मान पुरस्कारा’चे शनिवारी वितरण


पुणे : स्वावलंबन फाउंडेशन आयोजित ‘अष्टभुजा स्त्री सन्मान पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी (दि. २३) सिंहगड पायथ्याजवळील डोणजे गावातील नंदनवन सोसायटी येथे होणार असल्याची माहिती स्वावलंबन फाउंडेशनचे अध्यक्ष संजयजी पोवळे आणि सचिव विभा परब यांनी दिली.

महिलांच्या वैयक्तिक, कौटुंबिक,  सामाजिक, मानसिक, भावनिक, नैतिक, व्यावसायिक आणि आर्थिक उन्नतीच्या ध्येयाने कार्य करत असलेल्या स्वावलंबन फाऊंडेशनने गेल्या सहा महिन्यांमध्ये आपले कुटुंब आणि वैयक्तिक जबाबदाऱ्या सांभाळत कार्य करत असलेल्या आणि कोरोनाच्या बिकट परिस्थितीत सहा महिन्यांमध्ये आपल्या स्वावलंबन फाऊंडेशनमध्ये जे अवरीत कार्य करत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे त्या पदाधिकाऱ्यांना सन्मानित करत अष्टभुजा स्त्री सन्मान पुरस्कार घोषित केला आहे.

या पुरस्कारासाठी मुंबई विभागातून ठाणे प्रांत अध्यक्ष सौ पूजा इंदुलकर, मीडिया प्रेसिडेंट सौ. जान्हवी अस्लेकर, पुणे विभागातून पुणे प्रांत अध्यक्ष सौ अपर्णा खोत, पुणे प्रांत प्रशिक्षण उपक्रम अध्यक्ष व पुणे प्रांत उपाध्यक्ष सौ.  अनुजा कुलकर्णी, पुणे लीडर व निवड नियुक्ती अध्यक्ष सौ सोनाली कोदे आणि मुंबई व्यतिरिक्त विभागातुन उपसचिव सौ सोनाली नाईक, शैक्षणिक समिती मुख्य अध्यक्ष व व्यावसायिक वस्तू व सेवा प्रोजेक्ट हेड सौ पूनम मोहिते आणि कोकण प्रांत अध्यक्ष सौ रश्मी लुडबे यांची निवड करण्यात आलेली आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  राज्याच्या वतीने झालेला सन्मान हा विठ्ठलाच्या पूजेसारखा- सरन्यायाधीश उदय लळीत यांची भावना