मेट्रो प्रकल्प कारशेड गोळीबार प्रकरण : नक्की गुढ काय?


पुणे- कोथरुड येथील जुना कचरा डेपो येथे मेट्रो प्रकल्पाचे कारशेड आहे. संबंधित ठिकाणी बुधवारी सायंकाळी गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुरुवारी दुपारी पुन्हा गोळीबार होऊन तेथे दोन ते तीन रिकामी काडतुसे आढळली. मेट्रोच्या एका कर्मचाऱ्याच्या छातीलाही एक गोळी चाटून गेल्याने तो जखमी जल होता.  लष्करी सराव सुरू असताना हा प्रकार झाल्याचे बोलले जात होते. मात्र, कोथरुड येथील मेट्रोशेड परिसरात लष्कराचे कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण केंद्र किंवा युनिट नाही, त्यामुळे संबंधित गोळीबार प्रकरणाशी लष्कराचा संबंध नाही,’ असे लष्करातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.त्यामुळे आता “तो’ गोळीबार नेमका कोणी केला, याबाबतचे गूढ आणखी वाढले आहे.

दरम्यान, “सापडलेल्या पुंगळ्यांची लॉंग डिस्टन्सची शस्त्रे ही फक्‍त लष्करातच वापरली जात असल्याचे सांगितले जात आहेत. गुन्हेगार मोठ्या प्रमाणात देशी कट्ट्याचा वापर करतात. तरीही, सर्व शक्‍यता तपासून पाहिल्या जात आहेत,’ असे पोलीस सांगत आहेत.

अधिक वाचा  जन्मठेपेची 21 वर्षे शिक्षा भोगून आलेल्यांच्या आयुष्याला मिळाली नवी कलाटणी

या गोळीबारानंतर पोलिसांनी लष्कराशी पत्रव्यवहार केला आहे. तसेच, कोथरूड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी टेकडीवर जाऊन पाहणी केली आहे. पत्राचे उत्तर मिळाल्यानंतर खरे कारण समोर येईल, तसेच तपासात मदत होईल. सापडलेल्या गोळ्या “एसएलआर’ किंवा “47′ रायफलमधून आल्या असण्याची शक्‍यता आहे असे पोलिसांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love