खासदार बापट यांच्याकडून एक कोटी पासष्ट लाखाची मदत


पुणे : कोरोनामुळे आलेल्या संकटावर मात करण्यासाठी खासदार गिरीश बापट यांनी एक कोटी पासष्ट लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही मदत त्यांच्या खासदार निधीतून दिली जाणार असून त्यातून पुण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स व रूग्णवाहिका खरेदी करण्यात येणार आहेत.खा.बापट यांनी गुरूवारी पत्रकारांना ही माहिती दिली.

वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेला  ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स  मशीन खरेदी करण्यासाठी बापट यांनी 25 लाख रूपये  दिले आहेत. हा निधी उपलब्ध होण्यासाठी बापट यांनी आज जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांना पत्र दिले.

तसेच रुग्णवाहिकेची कमतरता पडू नये म्हणून दहा सामाजिक संस्थांना रुग्णवाहिका खरेदी करण्याकरिता एक कोटी चाळीस लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.  टेंडर प्रक्रिया व इतर आवश्यक बाबीची पूर्तता करून रुग्णांना ही मदत  उपलब्ध होईल. असेही बापट यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  चंद्रकांतदादा पाटील यांचा एक कोटीचा आमदार विकास निधी बाणेर येथील कोविड रुग्णालयासाठी