कोरोना लसींच्या दरांमधील फरक ही नफेखोरीच -नाना पटोले

निवडणुकीनंतरच मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेण्यात येणार
निवडणुकीनंतरच मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेण्यात येणार

पुणे- जगाच्या पाठीवरच्या सर्व देशांनी लसीकरनाचे नियोजन केले ते भारताला का करता आले नाही? असा सवाल करून आपल्या देशात लसीची निर्मिती झाली, आता सरकारी रुग्णालयांना चारशे रुपये व खाजगी रुग्णालयांना सहाशे रुपये दर ठरविण्यात आला आहे. कोरोना लसींच्या दरांमधील फरक ही नफेखोरीच आहे असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. केंद्र सरकारमध्ये बसलेले लोक व्यापारी दृष्टीकोन ठेऊन सत्ता चालवत आहेत. “हम दो, हमारे दो” तर चाललचं होतं पण आता या माध्यमातून आणखी परिवार वाढवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा प्रत्यय येत आहे अशी टीकाही त्यांनी केली.

पटोले म्हणाले, देशातील सर्वांना लसीकरण केले असते तर लोकांचे जीव वाचवता आले असते आणि ऑक्सिजन रेमडेसीविर सारख्या इंजेक्शनच्या काळ्याबाजारापासून पासून जनतेला वाचवता आले असते. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आपल्या देशाची अधोगती होत आहे.

ब्रिटनची लोकसंख्या साडेसात ते आठ कोटी आहे त्या ब्रिटनने चाळीस कोटी लसींची ऑर्डर दिली होती. ब्रिटनने संपूर्ण देशाचे लसीकरण केले, जगाच्या पाठीवरच्या सर्व देशांनी लसीकरणाचेचे नियोजन केले ते भारताला का करता आले नाही असा सवाल करून आपल्या देशात लसीची निर्मिती झाली. आता सरकारी रुग्णाला चारशे रुपये व खाजगी रुग्णालयांना सहाशे रुपये दर ठरविण्यात आला आहे. कोरोना लसींच्या दरांमधील फरक हे केंद्र सरकारमध्ये व्यापारी बसले असून ही नफेखोरी स्पष्टपणे दिसत आहे,  अशी टीका त्यांनी केली.  

अधिक वाचा  आठवडा उलटूनही आमदार पुत्रावर कारवाई नाही:पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यावर राजकीय दबाव ?

 पटोले म्हणाले, ज्या देशात ७० ते ८० टक्के लसीकरण झाले आहे, ते देश कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच तेथील लॉकडाऊनही संपला आणि लोकांचे जीव वाचले. आपल्या देशाच्या प्रमुखांनी देशातील कोविडचे नियोजन त्या पद्धतीने केले असते तर आज निरपराध लोकांचे जीव वाचऊ शकलो असतो. मात्र, मार्चच्या पहिल्या आठवड्यातच केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी भारतामधून कोविड संपलेला आहे असे जाहीर केले. त्यामुळे देशातील राज्यांनी गेल्यावर्षी कोविडसाठी जी तयारी केली होती ती कोविड सेंटर त्यांनी काढून टाकले. कोट्यावधी रुपये त्यामध्ये खर्च झाले. आज देशात जी मोठी लाट आली आहे. त्यामध्ये मृत्यूचे तांडव सुरु आहे. सर्वात मोठी समस्या ऑक्सिजनची आहे. दिल्लीमध्ये ऑक्सिजनअभावी २६ लोकांचा मृत्यू झाला. दिल्लीमध्ये ही परिस्थिती असेल तर देशभरातील परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येऊ शकतो. म्हणजेच या सर्वाचे मूळ ज्यामध्ये आहे ते म्हणजे देशात सर्वांचे लसीकरण झाले असते तर लोकांचा जीव वाचवता आला असता.

अधिक वाचा  ममता सरकारला 4 महिने मुदतवाढ मिळाली असती तर काय फरक पडला असता- जयंत पाटील

 राज्याने काही नियोजन का केले नाही, कोविशिल्ड लसची निर्मिती करणारे पूनावाला हे शरद पवार यांचे मित्र आहे. ते त्यांच्याशी बोलू शकतात याबाबत विचारले असता पटोले म्हणाले,  गेल्यावर्षी या महामारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय महामारी म्हणून घोषित केले. ही राष्ट्रीय महामारी आहे म्हटल्यावर त्याचे नियोजन केंद्राने करायला पाहिजे. अशा महामारीमध्ये देशाच्या जनतेच्या जीविताचे रक्षण करणे ही केंद्राची जबाबदारी असते.  केंद्र म्हणजे फक्त दिल्लीतले लोक नसतात सर्व राज्यातले लोक मिळून केंद्र सरकार बनलेले असते. त्यामुळे भेदभाव सरकारला करता येणार नाही. परंतु, संविधानाच्या बाहेर जाऊन जी हुकूमशाही निर्माण झाली आहे, त्याचा परिणाम आपला देश बघतो आहे असे सांगून पटोले म्हणाले,  दोष कोणाचा याचा विचार करण्याची ही वेळ नाही.  राजकारण करण्याचीही ही वेळ नाही.  सोनिया गांधी राहुल गांधी यांनी कोरोनाची साथ आपल्या देशात येण्या अगोदर अनेक वेळा विनंती आणि सूचना केल्या होत्या, परंतु त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन भाजपच्या भाडोत्री लोकांनी त्यांची टिंगल केली.  पण आज आपण बघतो आहे, लोकांचा जीव जात आहे ,त्याला जबाबदार कोण? असा सवालही त्यांनी केला.  

अधिक वाचा  शेतकरी आंदोलनावरून ट्वीट करणाऱ्या सचिन तेंडुलकरला शरद पवारांनी दिला हा सल्ला..

त्यावेळी काँग्रेस नेत्यांचे म्हणणे केंद्र सरकारने ऐकले असते तर आज आपल्या देशावर ही वेळ आली नसती हा मूळ प्रश्न आहे. पूनावाला शरद पवारांचे मित्र आहे आहे की काय या भानगडीत आम्हाला पडायचं नाही. अशा महामारीमध्ये केंद्र व राज्य सरकारचा समन्वय करून तशा पद्धतीचे धोरण केंद्र सरकारने राबवणे गरजेचे असते.  ही महामारी किंवा आत्ताची जी परिस्थिती आहे ती केवळ महाराष्ट्रात नाही. गुजरात, उत्तर प्रदेश हे राज्य स्मशानभूमी झाले आहेत.  सगळे आकडे इतर राज्यात लपविले जातात. महाराष्ट्रात कुठलेही आकडे लपवले जात नाहीत. संपूर्ण वस्तुस्थिती मांडली जाते.  त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे हे दाखविले जाते, हे चुकीचे आहे असेही पटोले म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love