राज्यात पुन्हा लॉकडाऊन? मुख्यमंत्री घेणार दोन दिवसांत निर्णय


मुंबई- कोरोनाचा संपूर्ण देशात उद्रेक झाला आहे. देशातील रोजची नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही चिंता निर्माण करणारी आहे. दिल्लीतही कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी आणि ‘विकेंड लॉकडाऊन’ करण्यात आला आहे. मात्र, अजूनही पाहिजे तशी परिस्थिति नियंत्रणात येत नसल्याने महाराष्ट्रातही ‘लॉकडाऊन’ लावण्याचे संकेत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत दोन दिवसांत निर्णय घेतील असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

दिल्ली सरकारने सहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यांची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाणार याची माहिती घेत असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

अधिक वाचा  #फोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्लांना आणखी एक धक्का

“राज्यात संचारबंदी लावूनही त्याचा फायदा पाहिजे त्या प्रमाणात दिसत नाही. अनेक व्यापाऱ्यांचा लॉकडाउनला विरोध होता. पण आज व्यापारी किंवा जीवनाश्यक वस्तूंची तसंच इतर लहान दुकानं असणारेही लॉकडाउन १०० टक्के करा अशी मागणी करत आहे. अनेक जिल्ह्यांमध्येही लोक मागणी करत असून आम्ही मुख्यमंत्र्यांना यासंबंधी माहिती दिली आहे. दोन दिवसांत कडक लॉकडाउनसंबंधी निर्णय अपेक्षित आहे. मुख्यमंत्री इतरांशी चर्चा करुन तो निर्णय घेतील,” असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love