रेमडिसीवीर इंजेक्शनचा पुरवठा दोन दिवसांत सुरळीत होईल – विक्रम कुमार


पुणे– कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन पुणे महापालिकेची यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे.  पुढील काळात रुग्णांसाठी खाटा कमी पडू देणार नाही असा विश्वास महापालिका  आयुक्त विक्रम कुमार यांनी व्यक्त केला. रेमडिसीवीर इंजेक्शनचा पुरवठा दोन दिवसांत सुरळीत होईल, तुटवडा जाणवणार नाही असेही त्यांनी नमूद केले.

फेब्रुवारी महीन्यापासून पुणे शहरांत कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली आहे. यानंतर प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची  माहीती आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकार परीषदेत दिली. यावेळी अतिरीक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य प्रमुख डॉ. आशीष भारती आदी उपस्थित होते. ‘‘सध्या शहरांत ४६ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनाबाधित आहे. त्यापैकी ३९ हजार रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. ५५० रुग्ण हे व्हेंटीलेटरवर आहेत, ४ हजार रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा सुरू आहे. दररोज वीस हजाराहून अधिक जणांची चाचणी केली जात आहे. यामध्ये पॉझिव्हीटी रेट हा २६ ते २८ टक्के आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने गेल्या पंधरा दिवसांत महापालिकेने साधारण खाटांची  संख्या ३ हजार ५०० वरुन ७ हजार ५०० पर्यंत वाढविली आहे. यामध्ये ऑक्सिजन बेडची संख्या २ हजार २०० वरून ४ हजार ८०० पर्यंत नेली आहे. तर व्हेंटीलेटरची संख्या २९० वरून ५५० पर्यंत आणली आहे. ’’ असे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  पुण्यात कोरोनाची भयावह स्थिती: खाटांची कमतरता आणि मृत्युदरात वाढ होणार?

पुढील काळात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन केल्या जाणाऱ्या नियोजनासंदर्भात विक्रम कुमार म्हणाले, ‘‘ बीबवेवाडी येथील ईएसआय रुग्णालय दोन दिवसांत कार्यान्वित  केले जाईल. तेथे ७० ऑक्सिजनयुक्त खाटा  आणि २० आयसीयुयुक्त  खाटा उपलब्ध होतील. तसेच लष्कराच्या रुग्णालयाकडून २० व्हेंटीलेट आणि २० आययसीयुयुक्त  खाटा  मिळणार आहेत. तर खासगी रुग्णालयांच्या २० व्हेंटीलेटरयुक्त  खाटा  मिळणार आहेत . व्हेंटीलेटर बेड ५० ने वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. ऑक्सिजनयुक्त खाटा  ४०० ने वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. सहा खासगी रुग्णालये ही कोविड रुग्णालये म्हणून आरक्षित केली आहेत. पुढील काळात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रुग्णालये ताब्यात घेण्यात येतील. रुग्णांना खाटा  कमी पडू दिल्या जाणार नाही.’’

रेमडिसिवीर या इंजेक्शनच्या पुरवठ्यासंदर्भात अन्न व औषध  प्रशासनाबरोबर चर्चा सुरू आहे. पुढील दोन दिवसांत दोन हजार डोस महापालीकेला मिळणार आहेत. पुरवठा सुरळीत होईल असा दावाही त्यांनी केला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love