पुण्यात कोरोनाची भयावह स्थिती: खाटांची कमतरता आणि मृत्युदरात वाढ होणार?


पुणे- पुणे शहर आणि जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या संकटाला प्रतिबंध कण्यासाठी आज जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुणे जिल्ह्यात मिनी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये संध्याकाळी सहा ते सकाळी सात पर्यंत सात दिवस संचारबंदीसह, शहर बस वाहतूक, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती आता भयावह झाली असून काल पुणे शहरातील (गुरुवार) दिवसभरात नवीन कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४१०३ इतकी होती तर ४९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. ही परिस्थिती आणखी कठीण होत जाणार आहे. आणि त्यामुळे खाटांच्या उपलब्धतेबाबत प्रश्न निर्माण होणार आहे तर मृत्युदरातही वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अधिक वाचा  शरद पवार यांचे देशपातळीवरील काम आणि आदराची भावना या सर्वांचा विचार करून नवीन पीढीने बोलले पाहिजे- अजित पवारांचा फडणविसांना टोला

पुणे जिल्ह्यातील खाटांची स्थिती

 – ऑक्सिजनसहित खाटा– 9118

– ऑक्सिजन विरहीत खाटा – 41093

– आयसीयुसहित खाटा – 2927

– व्हेंटिलेटर्ससहित खाटा – 996

उपचार सुरु असलेल्या खाटांची संख्या

ऑक्सिजनसह खाटा -उपचार संख्या – 2974

ऑक्सिजन विरहीतखाटा – उपचार संख्या – 11563

आयसीयुसह खाटा -उपचार संख्या – 1073

व्हेंटिलेटर्ससह खाटा- उपचार संख्या – 376

शिल्लक खाटा

– ऑक्सिजनसह उपलब्ध खाटा – 6144

– ऑक्सिजन विरहीत खाटा – 29530

– आयसीयुसह खाटा – 1854

– व्हेंटिलेटर्ससह खाटा – 620

सध्याची रुग्ण संख्या

– ऍक्टिव्ह रुग्ण – 61740

– रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या – 15986 ( यामधील गंभीर रुग्ण 4423 )

– घरी उपचार घेणारे रुग्ण – 45754

अधिक वाचा  ‘द एम्पॉवर हर फाउंडेशन’ चा कार्यक्रम १५ डिसेंबर रोजी : घे भरारी’ योजने अंतर्गत तीन मुलींचे स्वीकारणार पालकत्व

12 एप्रिलपर्यंतचा प्रशासकीय अनुमान

– ऑक्सिजन विरहित फक्त 9 खाटा शिल्लक राहतील

– 3207 ऑक्सिजनयुक्त खाटांची कमतरता भासेल

– 462 आयसीयुक्त खाटा शिल्लक राहतील

– 647 व्हेंटिलेटर्सची कमतरता भासेल

जिल्ह्याचा मृत्यूदर

– पुणे मनपा – 2 टक्के

– पिंपरी चिंचवड – 1.4 टक्के

– पुणे देहू व खडकी कॉनटोन्मेंट बोर्ड – 2.3 टक्के

– पुणे ग्रामीण – 1.9 टक्के

– पुणे जिल्ह्याचा एकूण मृत्यू दर – 1.8

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love