शेतकरी आंदोलनावरून ट्वीट करणाऱ्या सचिन तेंडुलकरला शरद पवारांनी दिला हा सल्ला..


पुणे- केंद्र  सरकारने पारित केलेले तीन कृषि कायदे रद्द करावेत या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाबाबत देशात आणि परदेशात पडसाद उमटत असतानाच पॉप सिंगर रिहाना हिने या आंदोलनाबाबत केलेल्या ट्वीटवरुन वादंग निर्माण झाले आणि परदेशी विरुद्ध देशी सेलिब्रिटी असे ट्वीट वॉर सुरू झाले.सचिन तेंडुलकर यानेही या वॉरमध्ये उडी घेत ट्वीट केले होते. त्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्याला सल्ला दिला आहे.

शेतकरी आंदोलनादरम्यान दिल्लीजवळ घडत असलेल्या घटनांबद्दल पॉपस्टार रिहानाने एक ट्वीट केलं. किसान एकता मंचाने या ट्वीटला रिप्लाय देत या पाठिंब्याबद्दल आभार मानले आणि या वादळ तोंड फुटले. सोशल मीडियावरयावरून  रणकंदन माजलं. कारण आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी विरुद्ध भारतीय सेलिब्रिटी असे दोन गट बनले.

अधिक वाचा  'हम दो हमारे दो'चा नारा,राहुल गांधी यांच्यासाठी उपयोगी -रामदास आठवले

अभिनेत्री कंगना राणावतने याविरोधातली पहिली प्रतिक्रिया दिली. त्या पाठोपाठ भारतातले अनेक सेलिब्रिटी एकवटलेत. अगदी लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यासोबतच अनिल कुंबळे, अजय देवगण, अक्षय कुमार, करण जोहर या सगळ्यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिल्या. या सगळ्यांनी #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda या हॅशटॅग्सचा वापर केला होता.

याबाबत माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी सचिन तेंडुलकरला सल्ला दिला आहे. पवार म्हणाले,हे सगळे का घडले, तर पंतप्रधानांनी मागे अमेरिकेत असताना मोदी-ट्रंप अशी घोषणा केली. त्याचे स्वागत काही घटकांनी केले. आता तशाच प्रकारची प्रतिक्रिया आज परदेशात पहायला मिळत आहे. भारतातील कलाकारांनी जी भूमिका घेतली आहे, त्याबद्दल सामान्य लोकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. आपले क्षेत्र सोडून इतर गोष्टींसंदर्भात बोलताना काळजी घ्यावी, असा माझा सचिनला सल्ला राहिल, असा चिमटा पवार यांनी काढला.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love